शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात लाल मिरचीने दिली शेतकऱ्यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:10 IST

Agriculture News : या संकटात शेतकºयांना लाल मिरचीने साथ दिल्याचे शेगाव परिसरात दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : कोरोना काळात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच मिरची उत्पादक शेतकºयांनी मिरची शेतातच पिकू देऊन लाल मिरचीचे उत्पन्न घेणे सुरू केले. त्यामुळे या संकटात शेतकºयांना लाल मिरचीने साथ दिल्याचे शेगाव परिसरात दिसत आहे.दरवर्षी शेतकरी आपल्या सोयीने बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेतात. प्रचंड परिश्रम घेऊन शेतात लागवड करतात. मात्र नैसर्गिक प्रकोप शेतकºयांच्या पाचवीला पूजलेला असतो. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावषीर्ही तसेच कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे. तालुकास्तरावरच्या बाजारपेठा प्रभावित झाल्या आहेत. भाजीपाला बाहेर जाणे थांबले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गडगडले. नाईलाजाने शेतकºयांना दोन ते चार रुपये किलोने वांगे, टोमॅटो विकावे लागले. पानकोबी, फुलकोबी तर एक रुपयाला विकण्याची वेळ आली. मात्र तालुक्यातील शेतकºयांना लाल मिरचीने साथ दिली. ३० रुपये किलो असलेला दर १५ रुपये किलोपर्यंत घसरल्याने शेतकºयांनी मिरची न तोडण्याचा निर्णय केला. तो फायद्याचा ठरला. साडेतीन किलो हिरव्या मिरचीचे एक किलो लाल मिरचीएवढे वजन भरते. लाल मिरचीचे दर सध्या १४० रुपये प्रती किलो आहे. दराचा विचार केल्यास शेतकन्यांना यातून बºयापैकी उत्पन्न मिळत आहे.  

महिला मजुरांना मिळाले कामn मिरची तोडण्यासाठी महिला मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील शेकडो हातांना काम मिळाले आहे. आतापासून पाच किलो, दहा किलो मिरचीची मागणी सुरू झाली आहे. n किमान पाच ते सात क्विंटल मिरची स्थानिक ग्राहकांना विकली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाचणार असून ग्राहकांनाही ती कमी किमतीत मिळेल.  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीShegaonशेगाव