शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात; १७ मुले जखमी

By निलेश जोशी | Updated: September 7, 2023 17:46 IST

बिबी-मांडवा मार्गावर अपघात

बीबी: लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन १७ मुले आणि चालक जखमी जााल आहे. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. जखमींना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

बीबी येथून एक किलोमीटर अंतरावर मांडवा रोडवर एस टी बस आणि सहकार विद्या मंदिर चे विद्यार्थी शाळेत बीबी येथे घेऊन येत असणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली. गोकुळाष्टमीनिमित्त मुले विविध वेशभुषा करून सहकार विद्यामंदिरामध्ये वाहनाद्वारे जात होते. दरम्यान मांडवा गावानजीक एसटी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शाळकरी मुलांच्या वाहनाची व एसटी बसची धडक झाली. या अपघातामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुले जखमी झाली असून वाहनाचा चालकही गंभरी जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच बीबी येथील दीपक गुलमोहर यांचे मित्र, सहकारी व ग्रामस्थांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनाद्वारे बीबी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वाहन चालक मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला मोठ्या प्रयासानंतर वाहनातून बाहेर काढण्यात आले. बीबी ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार करण्यास स्थानिक डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले.

दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मुले जात होती शाळेतगोकुळाष्टमीनिमित्त शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे शाळेच्या वाहनातील काही विद्यार्थी कृष्ण ,राधिकेची वेशभूषा करून वाहनात बसले होते. अपघातानंतर त्यांचे डबे, हार आणि पाण्याच्या बॉटल घटनास्थळी तशाच पडून होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बीबीचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनीही तत्काळ घटनास्थळ गाठले. बसमध्ये नऊ प्रवाशी होते, असे वाहक आर. टी वनारे यांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत बस चालकाची वैद्यकी चाचणी करण्यात आली नव्हती.