शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Accident: अनियंत्रित ट्रक सिलिंडरच्या ट्रकला धडक देऊन उलटला! दोघे जखमी

By अनिल गवई | Updated: January 2, 2023 21:16 IST

Accident: भरधाव ट्रकने सुरूवातीला सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलींडरच्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उलटला.

- अनिल गवईखामगाव - भरधाव ट्रकने सुरूवातीला सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलींडरच्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उलटला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान घडली. यात ट्रकचालकासह एक जण जखमी झाला आहे.

खामगाव येथून एमएच ४० एके ४४४७ क्रमांकाचा ट्रक नांदुराकडे राख घेऊन जात होता. दरम्यान, जलंब नाक्यासमोर या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरूवातीला सुटाळा येथील राजू जानकीराम बगाडे या सायकल स्वारास धडक दिली. त्यानंतर खामगाव ते सुटाळा पर्यंतच्या रस्तादुभाजकावरील विद्युत खांबांना धडक दिली. त्यानंतर एमएच ३७ टी ०२७१ या सिंलीडर घेऊन जाणाºया ट्रकच्या एका बाजूला धडक देत, रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. तात्काळ खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविले. ज्ञानेश्वर मुकींदा अंमलकार (४२ रा. काळेगाव ता. खामगाव) असे जखमी चालकाचे नाव असून वाहक अवधेशप्रताप(३४ रा. उत्तरप्रदेश) हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याचवेळी जखमी सायकल स्वाराला एका खासगी रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.सिलींडरच्या ट्रकला सुरक्षीत स्थळी हलविलेभरधाव ट्रकने धडक दिल्याने सिलींडरच्या ट्रक मधील काही सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. दरम्यान, शहर पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न लावता सिलींडरच्या ट्रकला सुरक्षीत ठिकाणी हलविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचा दावाही सुत्रांकडून करण्यात आला. या घटनेमुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा