शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताच लसीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:27 IST

Corona Vaccination : आतापर्यंत एक लाख ३१ हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व नागरिकांनी लस घेतली असून, ५७८८१ डोस उपलब्ध आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे.  रूग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत एक लाख ३१ हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व नागरिकांनी लस घेतली असून, ५७८८१ डोस उपलब्ध आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने लसीकरणालाही वेग आला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी,  फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ ते ६० वयोगटातील दुर्धर आजार असलेले नागरिक व ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. आता ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्याला एकूण एक लाख ८९ हजार लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी ५ एप्रिलपर्यंत एक लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये पहिला डोस ९१ हजार ३८८ नागरिकांना व दुसरा डोस ३८८ नागरिकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील २०६४६ नागरिकांनी लस घेतली आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील ६२७२३ हजार नागरिकांनी लसीकरण केले आहे. जिल्ह्यात सध्या ५७८८१ डोस उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात काही भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे, तर काही भागात कमी प्रतिसाद मिळत आहे. लसीची मुबलक उपलब्धता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची गरज आहे.    - डॉ. पंढरीनाथ कांबळे जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा  

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस