बुलडाणा : काेराेनाची संभाव्य तिसरी लाट पाहता जिल्ह्यात लसीकरणाला गती देण्यात येणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यात ८ व ९ सप्टेंबर राेजी विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयाेजन करण्यात आले आहे़ ७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या लसीकरण शिबिराचे साखरखेर्डा येथे उद्घाटन होणार आहे. यानंतर हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय स्तरावर खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
काेराेना लसीकरणाला देणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST