शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सारी’च्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:52 IST

Buldhana News तब्बल ७० टक्के रुग्ण हे तपासणीत कोरोना बाधीत आढळून आल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा दहा हजारांच्या टप्प्यात पोहोचला असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे १,१८९ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तब्बल ७० टक्के रुग्ण हे तपासणीत कोरोना बाधीत आढळून आल्याचे समोर आले आहे.त्यामुळे सारी अर्थात  सिव्हीयर ॲक्युट रेस्पीरेटरी इनफ्केशन असलेल्या रुग्णांचाही शोध आरोग्य विभागाकडून प्राधान्याने घेण्यात येत आहे.आरोग्य विभागाकडून नियमीतपणे सारीच्या रुग्णांचा सर्व्हेक्षणादरम्यान शोध घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्यी जिल्ह्यात व्याप्ती वाढत असतानाच सारीचेही रुग्ण कोरोना बाधीत निघत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे ठाकले होते. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजीच्या बुलडाणा जिल्ह्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात सारीचे १,१८९ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये अलिकडील काळात सरासरी सात रुग्ण हे सारीचे आढळून येत असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सारी आणि  आयएलएम ( इन्फ्युएनजा लाइक इन्फेक्शन) या दोन आजाराचे तब्बल १,५८९ रुग्ण आढळून आले होते. दरम्यान या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५६ हजार व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचेही स्पष्ट झाले होते.  सारी या आजारात दिसणारी लक्षणे आणि कोरोना संसर्गाच्या संदर्भाने दिसणारी लक्षणे जवळपास सारखीच आहेत. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असताना जिल्ह्यात सारीचेही रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. सारीच्या आजारामुळे बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ७९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या आजारावरही आरोग्य विभाग लक्ष केंद्रीत करत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या