शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नळगंगा प्रकल्पात २0 टक्केच जलसाठा

By admin | Updated: August 28, 2016 23:21 IST

मोताळा येथे पावसाची हजेरी; प्रकल्पक्षेत्रात केवळ ४७0 मि.मी पाऊस.

मुरलीधर चव्हाण मोताळा(जि. बुलडाणा),दि. २८: गत १८ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने मोताळय़ासह परिसरातील काही गावांमध्ये पुन्हा हजेरी लावली. मात्र त्यानंतरही आतापर्यंंंत ४७0 मि.मी. पाऊस झाला असून, पावसाअभावी तालुक्याची दरोमदार असलेल्या नळगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीने २0 ट क्य़ाची मजल गाठली. त्यामुळे पिकांना धोका कायम असून, मोठय़ा पावसाची गरज आहे.तालुक्यात कुठे रिपरिप, कुठे हलका तर काही ठिकाणी दमदार पडलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तालुक्यात यावर्षी जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने कमी अधिक प्रमाणात चांगली हजेरी लावली. परंतु मागील १८ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. बुधवारनंतर दोन दिवस मो ताळय़ासह कोथळी, तरोडा, शिरवा, खरबडी, आडविहिर, परडा, रिधोरा, रोहिणखेड, थड, काळेगाव त पोवन भागात चांगाल पाऊस झाला. तर डिडोळा, चिंचपूर, नळगंगापूर, भोरटेक, पिंपरीसह धामणगाव बढे परिसरात हलक्या सरी कोसळल्या आहेत. या पावसामुळे सोयाबीन पिकाला चांगलेच जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा तब्बल ८ हजार ९0८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, सोयाबीन पिकांचा खर्च कमी आणि बाजारभाव शाश्‍वत असल्याने शेतकर्‍यांनी यंदा सोयाबीनवर भर दिलेला आहे. जोरदार पावसाअभावी किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, ढगाळ वा तावरणामुळे पिके वेगवेगळया रोगराईस बळी पडत आहेत. विषारी औषधालाही कीड दाद देत नसल्याचे चित्र असून, शेतकरीवर्ग भविष्याबाबत धास्तावलेला आहे. तालुक्यातील १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ६८८.६ आहे. मागील अडीच महिन्यात ४७0 मि.मी. पाऊस झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस अधिक दिसत असला तरी आतापर्यंंंत झालेला पाऊस जोरदार नाही. तुकड्या-तुकड्यात रिमझिम झालेल्या या पावसामुळे पलढग व नळगंगा प्रकल्पात पाणीसाठवण झालेली नाही. त्यामुळे मोठय़ा स्वरूपाच्या पावसाची नितांत गरज आहे.