शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साखरखेर्डा कॉपी प्रकरणात अब्दुल अकिल सुत्रधार

By निलेश जोशी | Updated: March 15, 2023 18:30 IST

आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

साखरखेर्डा (जि. बुलढाणा): सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात अब्दुल अकिल अब्दुल मुनाफ हा मुख्यसुत्रधार असल्याची माहिती विशेष पथकाच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान त्याच्यासह पाच जण अद्यापही न्ययालयीन कोठडीत आहे.

या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. हे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले नसले तरी काही हजारांमध्ये ते झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.तीन मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात १२ वीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा होती. याप्रकरणाच्या तपासात बरेच तथ्य समोर आले होते. त्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी अटक सत्र सुरू केले होते तसेच चार शिक्षकांनाही निलंबीत करण्यात आले होते. दुसरीकडे प्रकरणाचे गांभिर्य पहाता जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी विशेष तपास पथक गठीत केले होते. या पथकाच्या तपासात उपरोक्त माहिती समोर आली होती. प्रकरणात लोणार येथील विद्यालयाचा प्राचार्य अब्दुल अकील अब्दुल मुनाफ हा मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच पेपरचे फोटो काढून ज्या काही ठरावीक व्यक्तींशी डिलींग झाले होते त्यांना ते पाठवले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात त्याच्यास गोपाल दामोदर शिंगणे (शेंदुर्जन), किनगाव जट्टू येथील संस्थेचा चालक गजानन आडे, लोणार येथील परीक्षा केंद्रावरील शिक्षक अंकुश पृथ्वीराज चव्हाण, दानिश खा फिरोज खा (शेंदुर्जन) यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. १३ मार्च रोजी सिंदखेड राजा न्यायालायने त्यांचा जामीनही फेटाळला आहे. दुसरीकडे याप्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भंडारी येथील तीन युवकांना जामीन मिळाला आहे.

सायबरचा एक कर्मचारी मदतीला

या प्रकरणात सायबर पोलिसांचा एक कर्मचारी हा विशेष पथकासोबत तपासात मदत करून असून सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील छुपे दुबे समोर आणण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे साखरखेर्डा पट्ट्यातील काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अवाजवी स्वरुपात शालेय फी आकारण्यात येते अशीही चर्चा आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा