शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरुन शेगावात पुजार्‍याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:27 IST

शेगाव (बुलडाणा) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून बुधवारी येथील एका मंदिराच्या पुजार्‍याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हालचाली करुन अपहृत पुजार्‍याची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत.

ठळक मुद्देदोघांना अटक; चार जण फरार

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (बुलडाणा) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून बुधवारी येथील एका मंदिराच्या पुजार्‍याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हालचाली करुन अपहृत पुजार्‍याची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत.येथील फारशीपुरा भागात असलेल्या सितलामाता मंदिरातील पुजारी श्रीकृष्ण रामदास बैरागी यांनी आपल्यावर जादूटोणा केल्याच्या संशयावरुन बुधवारी लोहारा (ता. बाळापूर) येथील येथील निलेश ठाकूर , बबलू ठाकूर यांनी शेगाव गाठले. माजी उपनगराध्यक्ष हाजी मंजूर अहेमद यांच्या मदतीने बैरागी यांचे घर शोधले व ऑटोमध्ये बसवून त्यांचे अपहरण करुन लोहारा येथे नेले. त्यानंतर एका ऑटोने अकोट तालुक्यातील पंचगव्हाण येथे एका धार्मिक स्थळावर नेऊन तूच आमच्यावर जादूटोणा केला, असे सांगून काठीने बेदम मारहाण केली. दरम्यान, पुजारी बैरागी यांच्या नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून घटनास्थळ गाठले व पुजार्‍याची सुटका केली.