बुलडाणा: तालुक्यातील भादोला वाडीमध्ये शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर मादी अस्वलाने हल्ला केला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून स्वत:ची सुटका केली. बुधवारी सकाळी ९ वाजतेच्या सुमारास भादोला शिवारात अस्वल फिरत होते. वाडी रस्त्यावरील एका शेतात संजय पद्माकर महाजन (वय ४६) काम करीत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यातून निसटत असताना महाजन यांचा डावा हात त्याच्या तोंडात सापडला. महाजन यांनी झटका दिल्यामुळे अस्वलाच्या तोंडातून हात निघाला आणि महाजन यांनी पळ काढला. वन विभागाला याची माहिती मिळताच तीन पथके भादोल्याच्या दिशेने रवाना झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश झोळे यांनी हल्ला करणारे अस्वल मादी असून, तिच्यासोबत दोन पिल्ले आहेत. वन विभागाच्या पथकाने घेराव तयार करुन अस्वलाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला
By admin | Updated: April 13, 2017 01:02 IST