शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील आशा वर्कर्सची होरपळ; आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 13:51 IST

बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काम करणाऱ्या  आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना मानधन न देता केवळ प्रकरणानुसार अत्यंत कमी मोबदला दिला जातो. परंतू या मोबदल्यासाठी सुद्धा अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने सध्या राज्यभरातील आशा वर्कर्सची होरपळ सुरू आहे.

ठळक मुद्दे राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा वर्कर्स तथा गट प्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्याच्या क्षेत्रात एवढे महत्वपूर्ण कार्य करणाºया आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना सरकारकडून कोणतेही निश्चित दरमहा मानधन दिले जात नाही.केवळ केसेसनिहाय त्यांना अत्यंत तोकडा मोबदला दिला जातो. हा मोबदला देखील सहा-सहा महिने मिळत नाही.

बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काम करणाऱ्या  आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना मानधन न देता केवळ प्रकरणानुसार अत्यंत कमी मोबदला दिला जातो. परंतू या मोबदल्यासाठी सुद्धा अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने सध्या राज्यभरातील आशा वर्कर्सची होरपळ सुरू आहे. त्यामुळे आशा वर्कर्स तथा गट प्रवर्तक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.महिलांची सुरक्षित प्रसूती, नवजात बालकांना योग्य ते लसीकरण तसेच माता-बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत आशा वर्कर्स तथा गट प्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडून वेळोवेळी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, शौचालयांचे सर्वेक्षण, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण, लोकसंख्या सर्वेक्षण, कुष्ठरोग आणि कॅन्सर या आजारांचे सर्वेक्षण केले जाते. आरोग्याच्या क्षेत्रात एवढे महत्वपूर्ण कार्य करणाºया आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना सरकारकडून कोणतेही निश्चित दरमहा मानधन दिले जात नाही. केवळ केसेसनिहाय त्यांना अत्यंत तोकडा मोबदला दिला जातो. हा मोबदला देखील सहा-सहा महिने मिळत नाही. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सीटूच्या झेंड्याखाली आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहे. मात्र शासनाकडून सातत्याने त्यांना केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. या आंदोलनात आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी वेतन सुरू करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, राष्ट्रीय आरोग्य मिशन कायमस्वरूपी करा, इंडियन लेबर कौन्सीलच्या शिफारसीप्रमाणे सर्व योजना कामगारांना १५ हजार रुपये दरमहा मानधन द्या, जननी सुरक्षा योजने अंतर्गत सर्व प्रसूतीचा मोबदला द्या, विमा, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन इत्यादी सुविधा सुरू करा, अशा विविध मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक आदोलनाच्या पावित्र्यात आहेत.मुंबईच्या आझाद मैदानावर करणार आंदोलनविविध मागण्यांसाठी निर्णायक आंदोलन करण्याच्या उद्देशाने ७ मार्चला आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हे विशाल धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूचे जिल्हा सेक्रेटरी पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख, वर्षा शेळके, शांता हिंगे, अरुणा रत्नपारखी, ऊर्मिला माठे, मंदा म्हसाल, ज्योती खर्चे, चंदा झोपे, विजया ठाकरे यांनी केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा