शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीला मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 3:03 PM

आरोग्य संस्थांमध्ये सुरू होणारा बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बालकांची जन्मत: आधार नोंदणी करण्याची सुविधा १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार होती. परंतू यासाठी आरोग्य संस्थेमध्ये नियूक्त केल्या जाणारी एक परिचारीका व लिपीकवर्गिय कर्मचाऱ्यांची आतापर्यंत परीक्षाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा हा उपक्रम लांबणीवर पडल्याने बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीला मुहूर्त केंव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड महत्त्वाची ओळख झालेली आहे. नवीन जन्मलेल्या बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आधार नोंदणी आवश्यक आहे. जन्मल्यानंतर बाळाचे अवघ्या काही तासांत आधार नोंदणी व्हावी, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा, उपजिल्हा, स्त्री व ग्रामीण अशा आरोग्य संस्थांमध्ये बालकांच्या आधार नोंदणीची ही सुविधा १ जानेवारी २०२० पासून उपलब्ध करून देण्यात येणार होती. सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आरोग्य विभागाचा हा उपक्रम फायद्याचा आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत परीक्षा घेऊन एक परिचारीका व लिपीकवर्गिय कर्मचारी आधार नोंदणीसाठी नियूक्त करण्यात येणार होते. प्रत्येक एका नोंदणीला या कर्मचाऱ्यांना २७ रुपये मानधन दिले जाणार आहे. हे १०० रूपयांपर्यंत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. त्यांना हे मानधन प्रोत्साहन म्हणून दिले जाणार असल्याची माहिती आहे. परंतू आतापर्यंत जिल्ह्यात परिचारीका व लिपीकाची परीक्षाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरोग्य संस्थांमध्ये सुरू होणारा बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. यासाठी आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने चार दिवसांचे प्रशिक्षण प्रक्रिया मागील महिन्यात पार पडली. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी वैद्यकीय अधिकाºयांसह दोन कर्मचाºयांचा यात समावेश आहे.नववर्षाचा योग हुकलाआधार नोंदणी करण्यासाठी हाताचे ठसे, डोळ्यांचे बाहुलींची प्रतिमा आणि ओळखपत्र अशी कागदपत्रे लागतात. मात्र, आरोग्य विभागाने बाळ जन्मल्यानंतर त्याला रुग्णालयातच आधार कार्ड देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्वसामान्य पालकांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. ही सुविधा रुग्णालयांमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर सुरू होणार होती. परंतू आरोग्य विभागाचा नववर्षाचा योग हुकला.नवजात बालकांची जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात आधार नोंदणी करण्याची सुविधा जवळपास दोन महिन्यात सुरू होईल. सध्या यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी परीक्षेला बसलेले आहेत. जिल्ह्यातून प्रत्येक इन्स्ट्यूटचे दोन कर्मचारी ही परीक्षा देत आहेत.- डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAdhar Cardआधार कार्ड