शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन नोट्स ऑर्डर करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी महिलेची दोन लाखाने फसवणूक

By भगवान वानखेडे | Updated: March 3, 2023 17:01 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची २ लाख २ हजार ९५० रुपयांनी फसवणूक झाली.

बुलढाणा :

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची २ लाख २ हजार ९५० रुपयांनी फसवणूक झाली. हा प्रकार २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत घडला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलढाणा शहरातील इतापे लेआऊट भागातील रहिवासी प्रमोद महादेव वावगे (५७) यांनी सायबर पोलीस स्टेशमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी पुजा प्रमोद वावगे या मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्या पुढील शिक्षणासाठी अभ्यास करीत असून, त्यांनी अभ्यासाकरिता ऑनलाइन नोटस ऑर्डर केल्या होत्या. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन येऊन ‘आपका पार्सल रुका हुआ है, अगर आपको छुडना है तो मै भेज रहा हू उस लिंकपर अभी छह रुपये ट्रान्सफर किजीए’ असे हिंदीतून सांगितले. यावरुन पुजा वावगे यांनी सहा रुपये ट्रान्सफर केले असता वावगे यांच्या एसबीआयच्या खात्यातून २ हजार ९५० रुपये आणि युनियन बॅंकेच्या खात्यातून एक लाख असे एक लाख २ हजार ९५० रुपये २८ फेब्रुवारी रोजी तर १ मार्च रोजी युनियन बॅंकेच्या खात्यातून १ लाख रुपये असे एकुण २ लाख २ हजार ९५० रुपये परस्पर काढून घेतले. अशा तक्रारीवरुन अज्ञांताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन कम्प्लेंट ॲप्सवर तीन रुपये ट्रान्सफर करताच खात्यातून १ लाख लंपासमलकापूर येथील सुनिल दादाराव देशमुख (५१) यांच्या मुलीने ऑनलाइन खरेदी केलेला टॅब पसंत न आल्याने तो परत करण्यासाठी गुगलवरील जागो ग्राहक जागो या कंन्झ्युमर कोर्ट वेबसाईटचा नंबर शोधला. त्यावर कॉल केला असता अनोळखी व्यक्तीने ऑनलाइन कम्प्लेंट नावाचे ॲप पाठवून त्यावर देशमुख यांच्या बॅंक खात्याची माहिती भरुन घेतली. दरम्यान ऑनलाइन तीन रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. तीन रुपये ट्रान्सफर करताच त्या सायबर भामट्याने आधी ९९ हजार नंतर १ हजार असे एकुण १ लाख रुपये काढून घेतले. तक्रारीवरुन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांत तीन घटना१ ते ३ मार्च दरम्यान जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीच्या तीन घटना घडल्या असून, जिल्ह्यात हे प्रमाण वाढत आहे.