शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू

By अनिल गवई | Updated: April 10, 2023 14:00 IST

दु:ख निवारण दरबारातील हजेरी ठरली अखेरची

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): अकोला जिल्ह्यातील पारस येथील श्री बाबुजी महाराज संस्थानात रविवारी रात्री घडलेल्या घटनेत खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील एका ६५ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. दु:ख निवारण करण्यासाठी दरबारात जाणे, महिलेची जीवन यात्रा संपविणारे ठरले. पार्वताबाई महादेव शुशीर असे मृतक महिलेचे नाव आहे.

अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्री बाबूजी महाराज संस्थान आहे. या संस्थानात दर रविवारी दु:ख निवारण दरबार भरतो. रविवारी  येथे दरबारासाठी भाविक मोठ्याप्रमाणात एकत्र जमले. दरम्यान, साडेसात वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वार्याने कडूलिंबाचे भलेमोठे झाड टिनपत्र्याच्या सभामंडपावर कोसळले. यात ठार झालेल्या सात भाविकांमध्ये खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील महिलेचा समावेश आहे. या महिलेची रविवारी उशिरा रात्री ओळख पटली. भालेगाव येथून दरबारासाठी सहकारी काही महिलांसह पारस येथे गेल्या असता ही घटना घडली. मृतक महिलेची ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा  सुन, नातवंड असा आप्त परिवार असून, भालेगाव बाजार, कुंबेफळ येथील वार्ताहर गजानन सुशीर यांच्या त्या मातोश्री होत्या.

दरबारात नियमित हजेरी

खामगाव तालुक्यातील विविध गावांतील महिलांनी पारस येथील दु:ख निवारण दरबारात नियमित हजेरी असते. रविवारीही खामगाव तालुक्यातील भालेगावसह कुंबेफळ, टाकळी तलाव, ढोरपगाव येथील काही महिलांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यू