शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

ऐतिहासिक शांती महोत्सवाची शांततेत सांगता

By अनिल गवई | Updated: November 6, 2023 17:56 IST

कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरुवात झाली.

खामगाव येथील शांती महोत्सवाची सोमवारी भक्तीभावाने सांगता झाली. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मिरवणुकीला जलालपुरा येथून प्रारंभ झाला. मिरवणुकीद्वारे हजारो भाविकांनी मोठी देवीला श्रध्देचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरात्रोत्सव मंडळासोबतच विविध ११७ मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान, अकरा दिवसांच्या पूर्जाअर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी मोठी देवीजवळ होमहवन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान, जलालपुरा भागातून मोठी देवीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

जगदंबा रोड, मेनरोड, गांधी चौक, अकोला बाजार, जनता बँक, परत जगदंबा रोड, भुसावळ चौक, मोठा पूल मार्गे दुपारी अडीच वाजता ही मिरवणूक सतीफैलात पोहोचली. याठिकाणी मोठी देवीची सामूहिक आरती करण्यात आली. काही वेळाच्या विसाव्यानंतर साडेतीन वाजताच्या सुमारास मोठी देवीच्या मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. ठक्कर ऑइल मिल, शिवाजीनगर, मोठा पूल, सरकी लाइन, मेनरोड, फरशी, सराफा पोस्ट ऑफीस, राणा गेटजवळून पुरवार गल्ली, शिवाजी वेस, सत्यनारायण मंदिर, घाटपुरी नाका, छोटी देवी मंदिर, जगदंबा संस्थानमार्गे घाटपुरी नदीच्या पुलापर्यंत पोहाेचून तेथून बायपासमार्गे उशिरा रात्री जनुना तलाव येथे देवीचे विसर्जन करण्यात आले. आई जगदंबेला (मोठी देवी) श्रध्देचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

गांधी चौकात मिरवणुकीचे स्वागत!

शहरातील गांधी चौकात मोठी देवीचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी वंदे मातरम् मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

प्रसादाचे वितरणगांधी चौकात वसंत महाराज अन्नकुटी परिवार आणि श्री शिव जगदंबा उत्सव मंडळाच्यावतीने प्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.सतीफैलात अनेकांना तरळले अश्रृ!सती फैलात स्थानिक भाविकांच्यावतीने देवीच्या पहिल्या ठाण्यावर खणानारळाची ओटी भरण्यात आली. हा क्षण डोळ्यात साठवणाऱ्या भाविकांच्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रू तरळले. जगदंबा विसर्जन मिरवणुकीत शहरातील ४५ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळाने सहभाग घेतला.