शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधण्याच्या कारणावरून वाद; दोन्ही कुटुंबांवर गुन्हे दाखल

By सदानंद सिरसाट | Updated: October 22, 2023 17:34 IST

घराच्या बांधकामावरून शेजारी कुटुंबामध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे शनिवारी सकाळी घडली.

खामगाव (बुलढाणा) : घराच्या बांधकामावरून शेजारी कुटुंबामध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही कुटुंबांतील आठजणांवर जळगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

याप्रकरणी जामोद येथील गोपाल मनोहर अवचार (४५) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आरोपीच्या घराचे बांधकाम करताना गॅलरी घराला लागण्याच्या मुद्द्यावर त्यांना हटकले असता शिवीगाळ करून मारहाण केल्याचे म्हटले. त्यावरून पोलिसांनी शुभम बबन अवचार, विक्की बबन अवचार, उषा बबन अवचार (तिन्ही रा. जामोद, ता जळगाव जा), शीतल उर्फ राणी संतोष धामोळे (रा. मालठाणा, ता. आकोट, जि. अकोला) या चौघांवर भादंविच्या कलम ३२४, ४५२, ३२३, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. तर दुसऱ्या गटातील उषा अवचार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांधकाम करण्यासाठी आखणी करताना आरोपीने तुझ्या जागेतच बांधकाम कर, अतिक्रमणाच्या जागेत घर बांधू नको, असे म्हटले. त्यावेळी जागेतच घर बांधणार, असे म्हटल्यावरही आरोपी गोपाल मनोहर अवचार याने मुलाला मारहाण केली. तसेच इतर आरोपी नलिनी गोपाल अवचार, नंदा मनोहर अवचार, गायत्री गोपाल अवचार यांनी मुलीला मारहाण केल्याचे म्हटले. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ४५२, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी