सिंदखेड राजा : तालुक्यात गतवर्षी गारपिटीमुळे कांदा बीजोत्पादन नष्ट झाले होते. तर यावर्षी दूषित हवामानामुळे कांद्याचे बी भरलेच नाही. बी तयार न झाल्यामुळे ९0 टक्के बीजोत्पादन घटले असून, कांदा बीजोत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षांंपासून सतत दुष्काळ, नापिकी, गारपीट होत आहे. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये कांदाबीज उत्पादन घेणारे असंख्य शेतकरी आहेत. तालुक्यातील नशिराबाद येथील नारायण देवराव मेहेत्रे, दिलीप कुंडलीक मेहेत्रे यांच्यासह अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादन घेत आहेत. गतवर्षी गारपीट झाल्यामुळे कांदा बीजोत्पादन पूर्णपणे नष्ट झाले होते. तर दूषित हवामानामुळे कांद्याचे बी भरलेच नाही. बी तयार न झाल्यामुळे ९0 टक्के बीजोत्पादन घटले आहे. त्यामुळे लागलेला उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कांदाबीज उत्पादनात ९0 टक्के घट
By admin | Updated: April 11, 2016 01:19 IST