बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज घेण्याच्या दुसर्या दिवशी १४ जुलै रोजी सायंकाळपर्यंत ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यापेक्षा अर्ज घेऊन जाणार्यांची संख्या मोठी असल्यामुळे येणार्या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ५२१ ग्रामपंचायती व २५ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूक प्रक्रियेतील १३ ते २0 जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख आहे; मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी एकूण ९४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात मेहकर तालुक्यातून १, लोणार १, मोताळा ३, नांदूरा ५, खामगाव ६0, शेगाव २, बुलडाणा २३ असे एकूण ९४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
निवडणुकीसाठी ९४ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: July 15, 2015 00:50 IST