शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील निवारा गृहातून ८८ जणांना घरी पाठविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:36 IST

रविवारपर्यंत टप्प्याटप्याने ८८ मजुरांना सोडण्यात आल्याने आता निवारागृहात केवळ १९ परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील शासकीय निवारागृहातून आतापर्यंत ८८ मजुरांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना संचारबंदी काळात खामगाव येथील मुलींच्या वस्तीगृहातील निवारागृहात महाराष्ट्रासहीत परराज्यातील १०७ मजूर अडकून पडले होते. दरम्यान, रविवारपर्यंत टप्प्याटप्याने ८८ मजुरांना सोडण्यात आल्याने आता निवारागृहात केवळ १९ परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत.कोरोना या विषाणू संक्रमनामुळे देशात अचानक लॉकडाउन जाहीर झाला. २३ मार्च पासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यात मजुरीसाठी गेलेले स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, प्रवासी आणि यात्रेकरू विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये खामगाव येथील निवारा गृहात १ एप्रिल रोजी १०७ मजुरांना क्वारंटीन करण्यात आले. दरम्यान, यापैकी २२ दिवस पूर्ण झालेल्या आणि महाराष्ट्र राज्यातील असलेल्या ३६ मजुरांना २२ एप्रिल रोजी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार घरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर निवारागृहात परप्रांतीय ७१ मजूर अडकून पडले होते. दरम्यान,  केंद्रीय गृहमंत्रालयाने एक गाइडलाइन्स जारी करीत परराज्यात अडकलेल्यांना आपापल्या घरी जाण्याची मुभा दिलीे. त्यानंतर निवारागृहातील ७१ पैकी ५२ स्थलांतरीत मजुरांना टप्प्या-टप्प्याने घरी पाठविण्यात आले. सुरूवातीला १४ मजुरांना घरी पाठविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी ०३ मजुरांना तर शनिवारी ०३ मजुरांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, रविवारी निवारागृहातील ३२ मजुरांना सोडण्यासाठीची प्रक्रीया पूर्णत्वास आल्याने त्यांनाही रविवारी सकाळी घरी पाठविण्यात आले. आता निवारागृहात केवळ १९ स्थलांतरीत परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत.

 १९ मजुरांना १३ तारखेला सोडणार!निवारागृहात वास्तव्यास असलेल्या १९ जणांना बुधवारी अमरावती येथे सोडण्यात येणार असल्याचे समजते. तत्पूर्वी रविवारी सकाळी बिहारच्या  ३२ जणांना खामगाव येथून अमरावतीसाठी नेण्यात आले. महसूल प्रशासनातील अधिकारी या मजूरांना सोडण्यासाठी अमरावती येथे गेलेत.

 खामगाव येथील निवारागृहात वास्तव्यास असलेल्या ८८ जणांना आतापर्यंत सोडण्यात आले. रविवारी बिहारच्या ३२ जणांना अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. तेथून त्यांना विशेष रेल्वेने गावी सोडण्यात येईल.- शितलकुमार रसाळतहसीलदार, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगार