शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सामाजिक वनीकरणाने केली ८३ हजार रोपांची लागवड

By admin | Updated: September 5, 2014 00:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात १ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट; ८३ हजार ७५0 झाडे लावली आहेत.

बुलडाणा : पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीची धडक मोहीम हाती घेऊन शतकोटी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सामाजिक वनीकरणाने या योजने अंतर्गत यावर्षी ८३ हजार ७५0 झाडे लावली आहेत. सामाजिक वनीकरणाने ४ लाख ४0 हजार रोपांची निर्मिती केली होती; मात्र यावर्षी उशिरा पाऊस आल्याने त्याचा फटका वृक्ष लागवडीला बसला आहे.सन २0१३ पासून राज्य शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली. जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, वन विभाग या सोब तच रोहयो योजने अंतर्गतसुद्धा ही योजना राबविण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच या सर्व विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्या जाते. त्यानुसार खड्डे खोदून ठेवल्या जातात. यासाठी रोपांची निर्मिती केली जाते. बुलडाणा जिल्ह्यात १३ तालुक्यात असलेल्या १२७ रोपवाटिकेमधून रोपे पुरविल्या जा त आहेत. सामाजिक वनीकरणाच्या जिल्ह्यात १२ ठिकाणी रोपवाटिका आहेत. यावर्षी या रोपवाटिकांमध्ये ४ लाख ४0 हजार ५७२ रोपे तयार करण्यात आली. यापैकी १ लाख २५ हजार रोपांचे वाटप केले तर ८३ हजार ७५0 रोपे सामाजिक वनीकरणाने जिल्हाभरात रस्त्याच्या कडेला, स्मशानभूमी, शाळा, मंदिरे, मोकळी जागा आणि शासकीय कार्यालय तसेच ग्रामपंचायतीच्या आवारात या वृक्षांचे रोपन केले. मागील वर्षी सामाजिक वनीकरणाला १ लाख ३0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ७३ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. ** पावसाचा फटकायावर्षी अर्धा पावसाळा कोरडा गेला. जून, जुलै महिन्यात या रोपांची लागवड होणे अपेक्षित होते; मात्र पाऊस न आल्याने तब्बल दोन महिने उशिरा रो पांची लागवड झाली. काही भागात जून, जुलै महिन्यात वृक्ष लागवड केली होती; मात्र पावसाअभावी ही रोपे करपून गेली. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या पावसाने आता रस्त्यालगतची झाडे चांगल्या प्रकारे उगवली आहेत.** तालुकानिहाय रोपांची लागवडमेहकर-             ६000देऊळगावराजा-  ८४00बुलडाणा -          ४७00खामगाव -         ७000शेगाव -             ५000लोणार -            ६८00जळगाव जा.-  १0000संग्रामपूर -        २८00सिंदखेडराजा-    ९४00मलकापूर -       ६000नांदुरा -            ५000चिखली -        १0000