शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बुलडाणा जिल्ह्यात ४३ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:19 IST

बुलडाणा: जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य निवडीसाठी २६ डिसेंबर रोजी जिल्हय़ात शांततेत मतदान झाले. दरम्यान, १७३ सरपंच पदांसाठीचे आणि ७६६ सदस्य पदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य २७ डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

ठळक मुद्देबुधवार, २७ डिसेंबरला होणार मतमोजणी६९ हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य निवडीसाठी २६ डिसेंबर रोजी जिल्हय़ात शांततेत मतदान झाले. दरम्यान, १७३ सरपंच पदांसाठीचे आणि ७६६ सदस्य पदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य २७ डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीत ८१ टक्के मतदान झाले असून, ६९ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हय़ातील १३ पैकी ११ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या या निवडणुका होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्षात मतदानास सुरुवात झाली. प्रारंभी संथगतीने असणारे हे मतदान दुपारी उन्हाचा पारा चढत असताना वाढले. दुपारी दीडपर्यंत ४३.४९ टक्के मतदान झाले होते. यामध्ये १९ हजार २६९ महिलांनी तर १८ हजार १७0 पुरुष अशा ३७ हजार ४३९ जणांनी मतदान केले. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया थांबली तोवर जिल्हय़ात सरासरी ८१ टक्के मतदान झाले होते. ४३ ग्रामपंचायतींमधील ८६ हजार ९४९ मतदारांपैकी ६९ हजार ५६0 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ७७.४0 टक्के, चिखली तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींसाठी ७९.७५, लोणार तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ८२.५४, मेहकरमधील  ग्रामपंचायतींसाठी ८२.१६, सिंदखेड राजामधील ६ ग्रामपंचायतींसाठी ७७, देऊळगाव राजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ८८.३९, खामगावमधील चार ग्रामपंचायतींसाठी ८६.१३, शेगावमधील दोन साठी ८४.९८, जळगाव जामोदमधील दोनसाठी ७४.५६, मलकापूरमधील एका ग्रामपंचायतीसाठी ७८.३३ आणि मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी ७९.८८ असे  एकूण ४१ ग्रामपंचायतींसाठी ८१.0१ टक्के मतदान झाले. दोन ठिकाणी तांत्रिक अडचण असल्याने तेथील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. या मतदान प्रक्रियेसाठी ८५0 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. ४३ ग्रामपंचायतींमधील १४४ प्रभागामध्ये ही  निवडणूक होत असून, १५२ मतदान केंद्रे यासाठी ठेवण्यात आली होती.

१६ जागा रिक्त४३ ग्रामपंचायतींच्या या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुका जरी असल्या तरी यातील १६ जागा या रिक्त राहिल्या आहेत. संबंधित जागेसाठी नामांकन अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे तेथे आगामी काळात पोटनिवडणुका घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले, तर ९५ जागा या अविरोध झाल्या आहे. २७ डिसेंबरला प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर याबाबतची तांत्रिकदृष्ट्या घोषणा केली जाईल. दुसरीकडे जळगाव जामोद तालुक्यातील कुंबरदेव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठीच उमेदवार नसल्याने येथेही या पदासाठी निवडणूक घेता आलेली नाही. परिणामी तेथेही भविष्यात संबंधित जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक