हिवरा आश्रम येथे निकालाकडे लक्ष
हिवरा आश्रम : ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवरा आश्रम येथील ग्रामपंचायती ११ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनलने आपापले उमेदवार दिले होते. एक पॅनल हे शिवसेना पुरस्कृत होते, तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांनी आपले उमेदवार घेऊन त्यांना उभे केले होते. अनेक वर्षांपासून हिवराआश्रम ग्रामपंचायतीमध्ये वडतकर यांचे वर्चस्व राहिले आहे. मागील वर्षी जिल्हा परिषद सदस्य करता भाजपा कडून तिकीट मिळून त्यांनी विजयश्री आपल्यापर्यंत खेचत आणली होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये स्वतःचे पॅनल विशेषत: एका प्रभागांमध्ये त्यांच्या स्वतःची पत्नी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे.