शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आठ किलो चांदी असलेली पिशवी लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:38 IST

चिखली : दुकानउघडताना आपल्याजवळील चांदीचे दागिने असलेली पिशवी दुकानातील काऊंटरवर ठेवणे एका सराफा व्यावसायिकास महागात पडले. काऊंटरवर ठेवलेली चांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात महिलेने अलगद लंपास केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सकाळी चिखलीत घडली.

ठळक मुद्देचिखली येथे संशयित महिला सीसीटीव्हीत कैद अज्ञात महिले विरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : दुकानउघडताना आपल्याजवळील चांदीचे दागिने असलेली पिशवी दुकानातील काऊंटरवर ठेवणे एका सराफा व्यावसायिकास महागात पडले. काऊंटरवर ठेवलेली चांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात महिलेने अलगद लंपास केल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सकाळी चिखलीत घडली. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी महिला दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. चिखली शहरातील सराफा व्यावसायीक भगवान पितांबर वाळेकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, २३ आॅक्टोबर रोजी नेहमी प्रमाणे आपले डीपी रोडवर असलेले श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाचे दुकान उघडले. त्यानंतर काऊंटरवर आठ किलो चांदीच्या दागिन्यांची पिशवी ठेवली. त्यामध्ये तोरड्या, पाटल्या यासह इतर अनेक दागिन्याचा समावेश होता. साफ सफाई करण्यासाठी दुकानाच्या आतील बाजूस असलेली झाडणी आणण्यासाठी गेलो असता काऊंटरवर ठेवलेली दागिन्यांची पिशवी लंपास झालेली आढळून आली. त्यानंतर आसपासच्या दुकानदाराकडे चौकशी केली असता दुकानाच्या आसपास काही अज्ञात महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी परिसरातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक अनोळखी महिला सदर पिशवी घेऊन जातांना दिसून आली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गवारगुरु पीएसआय गव्हाणे हे करीत आहेत. काही दिवसापूर्वी शहरातील एका सोनारास दीड लाख रुपयाचा गंडा घातला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच आज ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा