शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांसाठी ८ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:50 IST

दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे ही योजना सिंचन वाढविण्यासाठी उपक्रम जिल्ह्यात शेततळे निर्माण करण्यासाठी ८ कोटी ५४ लाख १४ हजार रूपये अनुदान वाटप 

हर्षनंदन वाघलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यात शेततळे निर्माण करण्यासाठी ८ कोटी ५४ लाख लाख १४ हजार रूपये अनुदान निधी वाटप करण्यात आले असून सर्वात जास्त निधी खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख ४५ हजार रूपये निधी वाटप करण्यात आला आहे. या योजनेमुळे कोरडवाहू शेतकºयांची सिंचन क्षमता वाढली आहे. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गंत एकूण ५ हजार शेततळ्यांचे लक्षांक ठेवण्यात आले होते. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जातून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकºयांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकºयांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली. मात्र  त्यौपैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. अशा कामे पूर्ण झालेल्या शेतकºयांना शेततळ्याची अनुदान रक्कम ८ कोटी ५४ लाख १४ हजार रूपये वाटप करण्यात आले आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यात ४७ लाख ४८ हजार रूपये, चिखली तालुक्यात ६३ लाख ७० हजार, मोताळा तालुक्यात ७४ लाख ९४ हजार, मलकापूर तालुक्यात ५९ लाख ८ हजार, खामगाव तालुक्यात ९७ लाख ७६ हजार, शेगाव तालुक्यात ७२ लाख २५ हजार, नांदूरा तालुक्यात ५७ लाख ७१ हजार, संग्रामपूर तालुक्यात ७४ हजार ४६ हजार, जळगाव जामोद तालुक्यात ५६ हजार २७ हजार, मेहकर तालुक्यात ५२ लाख २२ हजार, लोणार तालुक्यात ५७ लाख २२ हजार, देऊळगाव राजा तालुक्यात ८२ हजार ४१ हजार व सिंंदखेड राजा तालुक्यात ५६ लाख १७ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले.

खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख अनुदान वाटपमागेल त्याला शेततळे अनुदान योजनेअंतर्गंत सर्वात जास्त अनुदान खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख ४५ हजार रूपये निधी वाटप करण्यात आले. त्यानंतर मेहकर उपविभागात  २ कोटी ४८ लाख २ हजार रूपये तर बुलडाणा उपविभागात सर्वात कमी २ कोटी ४५ लाख २९ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले.