शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसामुळे ७९ हजार हेक्टरवरील तूर पिकाला धोका; शेतात पाणी साचल्याने पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव 

By योगेश देऊळकार | Updated: September 12, 2022 19:47 IST

अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

योगेश देऊळकार, खामगाव : जिल्ह्यात बहुतांश भागात १० सप्टेंबर रोजी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे ७९ हजार ३५० हेक्टरवरील पीक धोक्यात आले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

यावर्षी जिल्ह्यात खरीप पेरण्या विलंबाने झाल्या. यामुळे शेतकऱ्यांनी उडीद, मुगाकडे पाठ फिरवित सोयाबिन पिकाला सर्वाधिक पसंती दर्शविली. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर २ लाख २ हजार ९९७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. या दोन्ही पिकांमध्ये आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी करण्यात आली असून या पिकाचे क्षेत्र ७९ हजार ३५० एवढे आहे. आतापर्यंत योग्य वेळी व योग्य प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच पिके चांगली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा कपाशी व मका पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबरच पाणी साचणाऱ्या शेतजमिनीवरील तूर पिकावरही पावसाचा परिणाम झाला आहे. अतिपावसामुळे हे पिक पिवळे पडून सुकत असल्याचे दिसून येत आहे.

पाण्याची वाट मोकळी करावी

तूर पिक असलेल्या शेतात पाणी साचणे घातक आहे. यामुळे या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीक नष्ट होण्याची भीती वाढते. मर रोगाची लागण देखील यामुळे होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी पाऊस थांबताच शेतातील पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, असे आवाहन जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

उत्पादनात घट येण्याची भीती

पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पिक सुकत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिकस्थिती चांगली असताना अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे या पिकाला खूप मोठी झळ बसली आहे.

अतिपावसाचा तूर पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीची झाडे सुकत आहेत. या पिकाची कृषी विभागाकडून पाहणी करून रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. - संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.

सततच्या पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली असून पिक पिवळे पडले आहे. काही झाडे देखील सुकत आहेत. - सतीश सोनटक्के, शेतकरी जलंब. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती