शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:26 IST

बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. तिसऱ्या लॉटरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरीता १८ जुलैची अंतीम मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रामध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे. मोफत प्रवेशासाठी ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज आले आहेत. त्यापैकी पाहिल्या दोन लॉटरीमध्ये २ हजार ७०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान, १० जुलै रोजी राज्यस्तरीय तिसरी लॉटरी काढण्यात आली. तिसºया लॉटरीमध्ये ७७२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४८० विद्यार्थ्यांची एकूण तीन लॉटरींमधून निवड करण्यात आली आहे.सध्या तिसºया लॉटरीत निवड झालेल्या ७७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू आहे. शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी गेला असल्याने प्रवेशाकरीता पालकांची तारांबळ उडत आहे. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना नंबर लागल्याने आता ही संधी हुकायला नको, यासाठी पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पालकांना एसएमस जाण्यास सुरूवात१० जुलै २०१९ रोजी राज्यस्तरीय तिसरी लॉटरी काढण्यात आली आहे. राज्यातील लॉटरी लागलेल्या पालकांना ११ जुलै २०१९ पासून एसएमएस जाण्यास सुरवात झाली आहे. एसएमएस न आल्यास वेबसाईट वर जाऊन ‘अ‍ॅप्लीकेशन वाईज डिटेल्स’मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का ते पाहावे लागणार आहे. फक्त एसएमएसवर अवलंबून राहू, नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.प्रवेशासाठी सहा दिवस४तिसºया लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ जुलै पासून १८ जुलै पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिलया आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी पालकांना सात दिवसाचा कालावधी देण्यात आला असून, आता अवघे सहा दिवस पालकांच्या हातात उरले आहेत. सध्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमास सुरूवात झालेली असल्याने प्रवेशासाठी पालकांच्या धवपळ सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा