शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

सिंदखेड राजा तालुक्यात ग्रा.पं.साठी ७७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:54 IST

सिंदखेडराजा : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, सर्वाधिक वरोडी येथे ९५ टक्के मतदान झाले तर सवडद ग्रा.पं.साठी ८0.५ टक्के मतदान झाले.  

ठळक मुद्देवरोडी येथे सर्वाधिक ९५ टक्के मतदानबुधवारी होणार मतमोजणी  

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, सर्वाधिक वरोडी येथे ९५ टक्के मतदान झाले तर सवडद ग्रा.पं.साठी ८0.५ टक्के मतदान झाले.  सवडद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार सरपंच पदासाठी उभे होते. जनतेतून सरपंच निवडल्या जाणार असल्याने मतदारात वेगळाच उत्साह होता. एक-एक मतदान जमा करता करता उमेदवार आणि कार्यकर्त्यांत चांगलीच दमछाक झाली. सवडद येथे ८0.५ टक्के मतदान झाले. वरोडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.भुजंगराव गारोळे यांची प्रा.सदानंद गुंजकर यांच्याशी सरळ लढत झाली. वरोडी आणि शेवगा जहांगीर गट ग्रामपंचायत असताना येथे विक्रमी ९५ टक्के मतदान झाले. मोहाडी येथे व.जा.इंगळे आणि अशोक रिंढे यांची सरळ लढत झाली असून, मोहाडीतही प्रथमच ८८ टक्के मतदान झाले आहे. येथे १३११ पैकी ११४८ मतदारांनी मतदान केले. दरेगाव येथेही ८१ टक्के मतदान झाले आहे. नसिराबाद आणि पांग्री उगले येथे सरासरी ८१ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी बुथवर रांगा लावल्या होत्या. दुपारी १२ पर्यंत ५0 ते ५५ टक्के मतदान झाले होते. सवडद येथे वयस्क (वृद्ध) मतदारांचे मतदान कार्यकर्ते किंवा नातेवाईक करीत असल्याने बुथ एजंटांनी आक्षेप घेतला होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मतमोजणी सिंदखेड राजा येथे होणार असून, १२ वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होईल. यावेळी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. 

मोताळा तालुक्यात सरासरी ८0 टक्के मतदानतालुक्यात डिडोळा बु. व गोतमारा या दोन ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी ७९.८८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात होते. बुधवार २७ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता मोताळा तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.     तालुक्यातील डिडोळा बु. ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी सहा तर सदस्यपदासाठी १६ उमेदवार रिंगणात होते. तसेच गोतमारा ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी सात व सदस्यपदासाठी नऊ उमेदवारांनी निवडणूक लढवली. मंगळवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत मतदान पार पडले असून, दोन्ही ग्रामपंचायतींसाठी २ हजार ९९७ पैकी २ हजार ३९४ मतदारांनी मतदान केले. यात डिडोळा बुद्रुक ग्रा.पं.साठी ७७.८0 टक्के तर, गोतमारा येथे ८२.४८ टक्के इतके मतदान झाले आहे. डिडोळा येथील १६६७ पैकी १२९७ मतदारांनी मतदान केले. यात ६९५ पुरुष तर ६0२ महिला मतदारांचा समावेश आहे. गोतमारा येथील १३३0 पैकी १0९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ५९0 पुरुष तर ५0७ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार एस.के. डोईफोडे, नायब तहसीलदार एस.एम. चव्हाण, निवडणूक लिपिक एस.ए. कन्नर, सी.पी. भोंबे यांच्यासह सहकारी कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

लोणार : ८५.५४ टक्के मतदानलोणार तालुक्यातील सोमठाणा, देऊळगाव वायसा, पार्डी सिरसाट या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ८५.५४ टक्के मतदान झाले. एकूण ४ हजार ३५९ पैकी ३ हजार ५९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. तीनही ग्रामपंचायतमध्ये शांततेत मतदान पार पडले. २६ डिसेंबर रोजी मतदान लोणार तालुक्यातील पार्डी सिरसाट, देऊळगाव वायसा, सोमठाणा या तीन ग्रामपंचायतसाठी मतदान झाले. या तीन ग्रामपंचायतसाठी एकूण ९ बुथवर मतदान घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय पिंपरकर यांनी काम पाहिले. गुरूवारला मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकbuldhanaबुलडाणा