शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डवरील ७५ हजार नावे होणार कमी!

By admin | Updated: April 2, 2017 01:57 IST

आधार लिंकिंग न केल्याचा परिणाम; खामगावकरांनी दाखवली उदासीनता.

खामगाव, दि. १- तालुक्यातील जवळपास ७५ हजार लाभार्थींचे आधार लिंकिंग न झाल्याने त्यांची नावे रेशन कार्डवरून वगळली जाणार आहेत. विशेषत: खामगाव शहरातील रहिवाशांनी आधार लिंकिंगबाबत उदासीनता दाखवलेली आहे. तालुक्यातील सर्वच प्रकारच्या रेशनकार्डधारक कुटुंबांची एकूण संख्या ५२ हजार ५७१ असून, एकूण लाभार्थीसंख्या २ लाख ६0 हजार आहे. या सर्व लाभार्थींचे आधार लिंकिंग करुन घेण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याकरिता नागरिकांना आपला आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. मागील आठवड्यातही पुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून २७ मार्चपर्यंत आधार लिंकिंग करून घेण्याचे आवाहन केले. तसेच खामगाव शहरात तीन दिवस ऑटोरिक्षा फिरवून जाहीर आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिकांनी याबाबत मोठय़ा प्रमाणात उदासीनता दाखविल्याचे दिसून येते. मार्चअखेरपर्यंत १ लाख ७८ हजार लाभार्थींचे आधार लिंकिंग झालेले असून, मागील आठवड्यात राबविलेल्या प्रचार मोहिमेतून केवळ सात हजार आधार लिंकिंगचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यांची आधार लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तब्बल ७५ हजार लाभार्थींचे अर्जच अद्याप न आल्याने आता या लाभार्थींची नावे रेशनकार्डवरून कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आधार लिंकिंग न झालेली सुमारे ७0 टक्के नावे ही खामगाव शहरातील असून, शहरवासीयांनी याबाबत प्रचंड उदासीनता दाखवल्याचे दिसून येते. मुदत आणखी वाढविण्याची मागणीआधार लिंकिंगअभावी स्वस्त धान्यासह शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची पाळी लाभधारकांवर येऊ शकते. त्यामुळे आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेण्याकरिता प्रशासनाने आणखी मुदतवाढ द्यायला हवी, अशी मागणी रेशन कार्डधारकांकडून होत आहे.गैरप्रकारांना बसणार आळाअनेक लाभार्थींची नावे दोन-दोन ठिकाणी रेशन कार्डवर असल्याचे आधार लिंकिंग प्रक्रियेत दिसून आलेले आहे. विशेषत: लग्न होऊन सासरी जाणार्‍या मुलींच्या बाबतीत असे होताना दिसते. तसेच बाहेरगावी निघून गेलेल्यांची नावे रेशन कार्डवर आहेत. त्यांच्या नावे धान्याची उचल केली जाते. अशा अनेक गैरप्रकारांना आधार लिंकिंगमुळे आळा बसणार असून, शासनाचे नुकसान टळणार आहे.धान्य उचलण्यासाठी थम्ब मशीन!आधार कार्ड जोडणी झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानावर धान्य घेण्यासाठी गेलेल्या लाभार्थीला त्या ठिकाणी असलेल्या थम्ब मशीनवर अंगठा ठेवावा लागणार आहे. त्यानंतर धान्याची उचल होणार आहे. यामुळे शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्षात किती लोक घेतात व स्वस्त धान्य दुकानातून किती प्रमाणात धान्य विक्री होते, याचा अंदाज लागणार आहे.