साखरखेर्डा येथे ७०. २७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:29 AM2021-01-17T04:29:30+5:302021-01-17T04:29:30+5:30

साखरखेर्डा : साखरखेर्डा ग्राम पंचायत निवडणुकीत ७०.२७ टक्के मतदान झाले. ११ हजार ५९१ मतदारांपैकी ८ हजार १४६ ...

70 at Sakharkheda. 27% turnout | साखरखेर्डा येथे ७०. २७ टक्के मतदान

साखरखेर्डा येथे ७०. २७ टक्के मतदान

Next

साखरखेर्डा : साखरखेर्डा ग्राम पंचायत निवडणुकीत ७०.२७ टक्के मतदान झाले. ११ हजार ५९१ मतदारांपैकी ८ हजार १४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १७ सदस्यांकरिता झालेल्या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सकाळी ७:३० वाजता काही उमेदवारांनी चिन्ह दिसत नसल्याची तक्रार मतदान केंद्र प्रमुखांकडे केली होती. काही काळासाठी मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती; परंतु उमेदवार प्रतिनिधी यांनी चिन्ह दिसत आहे, असे सांगितल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. या गोंधळात ३० मिनिटांचा वेळ गेला. वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने मतदान करताना चिन्ह स्पष्ट दिसत नव्हते. दुपारी ११ वाजतापासून जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत मतदारांची प्रचंड गर्दी वाढल्याने ठाणेदार यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुपच कसरत करावी लागली. वार्ड क्रमांक एकमध्ये २२२७ पैकी १५२१ मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक दोनमध्ये २०५८ पैकी १४९५ मतदान झाले. वार्ड क्रमांक तीन मध्ये १४०८ पैकी ९५९ मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक चारमध्ये २१८४ पैकी १६१५ मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक पाचमध्ये १८८१ पैकी १३४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वार्ड क्रमांक सहामध्ये १८६९ पैकी १२१३ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत ४३३४ पुरुष आणि ३८१२ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल रवींद्र पाटील , जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांची सून ज्योती सचिन जाधव, भाजपा नेते उल्हास प्रभाकर देशपांडे, विद्यमान सरपंच महेंद्र पाटील, माजी सभापती राजू ठोके यांच्या मातोश्री लीलाबाई श्रीपत ठोके, माजी उपसभापती सुनील जगताप यांच्या पत्नी सुमन सुनील जगताप, सय्यद रफीक, शेख रफीक तांबोळी हेही निवडणूक रिंगणात उतरले होते . या मातब्बर गावनेत्यांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे . निवडणूक विजयाचे आराखडे मांडले जात आहेत. साखरखेर्डा ग्राम विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली आहे.

Web Title: 70 at Sakharkheda. 27% turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.