शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ७० नवे कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १६८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:18 IST

७० कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १,६८७ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा ७० कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १,६८७ वर पोहोचली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या ४७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे खामगावातील शिवाजीनगरमधील एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा येथे बजरंगनरमध्ये एक, काँग्रेसनगर मध्ये एक, जिल्हा न्यायालयातील दोन, जुन्यागावातील दोन, सुंदरखेडमधील एक, तानाजी नगरमधील एक आणखी एक असे एकूण नऊ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. बुलडाणा तालुक्यातील केसापूर येथे एक, साखळी येथे एक, दत्तपूर येथे एक, मलकापूरमध्ये दोन, नांदुऱ्यात सात, वसाडी बुद्रूक येथे तीन, चांदुरबिस्वा येथे दोन, चिखली येथे एक, शेगावमध्ये चार, लोणारात पाच, गोतमारा येथे दहा, देऊळगाव राजातील अंभोरा येथे एक, असोला येथे दोन, देऊळगाव राजात पाच, डिग्रस येथे १३, खामगाव शहरातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, खामगावमधील शिवाजीनगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.बुधवारी ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर एक, सुलतानपूर एक, नांदुºयातील पाच, खामगावमधील चार जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ११ हजार ९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याच प्रमाणे ९९० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा