शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू केला सहावीचा वर्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:13 IST

लोणीगवळी येथील जिल्हा परिषद शाळा: गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : लोणीगवळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता सहावा वर्ग सुरू करण्यात आला असून, हा वर्ग सुरू करीत असताना मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची तक्रार लोणीगवळी येथील नरसिंग भास्करराव पाटील यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावल्याने पालकांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वाढत आहे, तर तालुक्यातील लोणीगवळी येथील मुख्याध्यापक व शिक्षकांकडून पालकांची दिशाभूल करण्यात येत असून, शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावा वर्ग सुरू करण्यात आला असून, नियमबाह्य सुरू केलेला हा वर्ग बंद करून पालकांची व शिक्षण विभागाची दिशाभूल करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी तक्रार लोणीगवळी येथील नरसिंग भास्करराव पाटील यांनी गटशिक्षण अधिकारी मेहकर यांच्याकडे केली आहे. लोणीगवळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता सहावा वर्ग सुरू करण्यात आला आहे; परंतु हा वर्ग सुरू करीत असताना मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या एक किलोमीटरच्या आत निमशासकीय अनुदान प्राप्त शाळा असून, त्या ठिकाणी वर्ग ५ ते १२ वीपर्यंत वर्ग असून, शिक्षणसुद्धा व्यवस्थित सुरू आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शासनाची व पालकांची दिशाभूल करून सहावा वर्ग सुरू केला आहे. ही एकप्रकारे विद्यार्थी व पालकांची फसवणूक आहे. त्यामुळे शासनाची व पालकांची दिशाभूल करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी व नियमबाह्य सुरू केलेला सहावा वर्ग बंद करावा, अशी मागणीही नरसिंग भास्करराव पाटील यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. लोणीगवळी येथील जिल्हा परिषद शाळेला सहावा वर्ग काढण्याचे कोणतेही आदेश नाही. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, त्याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच पाचवा वर्ग पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसा दाखला नेलेला नाही, असे संबंधित शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यावर चौकशी करून कारवाई करू. - किशोर पागोरे, गटशिक्षणाधिकारी,मेहकर.