शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्त्यांच्या कामासाठी ६९५ कोटी; ५७५ कोटींचा झाला खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:13 PM

Jigaon project : रस्ते व पुलांच्या कामासाठी आतापर्यंतआतार्पंत ५७५ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्ते व पुलांच्या कामासाठी आतापर्यंत ६९५ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत असून यातील बहुतांश रस्ते व पुलांची कामे मार्गी लागली आहे. त्यावर आतार्पंत ५७५ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत अनुषंगीक माहिती देण्यात आली. जिगावमुळे तीन मोटे पुल व तीन रस्ते प्रामुख्याने बाधीत होत होते. अंतर्गत पोच रस्त्यांनाही यामुळे फटका बसत होता. त्यानुषंगाने गेल्या पाच ते सात वर्षात या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले होते. अनुषंगीक ही सर्व कामे जवळपास पुर्णत्वास गेली आहे. त्यातील काही रस्ते अल्पावधीतच रहदारीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने जिगाव प्रकल्प व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशिल असल्याची माहिती सुत्रांनी दिली.प्रामुख्याने नांदुरा-खांडवी- जळगाव जामोद राज्य मार्गावरील पुर्णा नदीवर असलेला पुल, खामगाव-जलंब-भेंडवभल या प्रमुख जिल्हा मार्गावरील भोटा व मस परिसरातील पूल, अंतर्गत पोच रस्ते, शेगाव-वरवट- टुनकी या राज्य मार्ग क्रमांक १७३ वरील खिरोडा येथील पुल व रस्ता तसेच खांडवी-भेंडवळ रस्त, भेंडवळ-वरवट रस्ता, पहुरपूर्णा-भास्तान रस्ता यासह अन्य काही रस्ते तथा छोटे पुल व नाल्यांची कामे करण्यात आली आहे. पुलांसाठी आतापर्यंत ३८५ कोटी २७ लाख रुपयांचा खर्च झाला असून पोच मार्गांसाठी ३०९ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. बहुतांश कामे अंतिम टप्प्या असून त्यावर ६९५ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. 

११९ कोटींची कामे बाकीअद्यापही जिगाव प्रकल्पामुळे बाधीत होणारे रस्ते आबाधीत करण्यासाठी जवळपास ११९ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. यासंदर्भात मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सामंजस्य करारही झाला आहे. त्यानुसार या कामांचे मुल्यांकन करून निधीची तरतूदही करण्यात आली होती. त्यासाठीचा निधीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला असल्याची माहिती दिशा समितीच्या बैठकीत देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प