शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ६८ प्रकारची फुलपाखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 13:19 IST

अलिकडील काळात शेतात किटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढल्यामुळे या फुलपाखरांना धोका निर्माण झाला आ

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जैवविविधतेची भरमार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात एका सर्वेक्षणानुसार जवळपास ६८ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. मात्र अलिकडील काळात शेतात किटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढल्यामुळे या फुलपाखरांना धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, दुर्मिळ प्रकारात मोडणारे सिलव्हर लाईन हे फुलपाखरूही ज्ञानगंगा अभयारण्यात क्वचित प्रसंगी आढळून येते. दरम्यान फुलपाखरे प्रामुख्याने दोन प्रकारची असून पतंग आणि फुलपाखरू असे त्याचे दोन प्रकार पडतात. फुलपाखरे म्हंटलेकी ऊन्ह, फुले, पालवी, गवत आणि पानाच्या सावलीत खालील बाजूने प्रामुख्याने पुलपाखरे आढळून येतात. या व्यतिरिक्त मॉथ प्रकरातील फुलपाखरेही जिल्ह्यात आहेत. यात पाच ते सहा प्रकार आढळून येतात. प्रामुख्याने स्थिर पद्धतीने उडणारी ही पुलपाखरे फुलांचा रस शोषत असतात. हे चित्र बघण्यासारखे असते.त्यातच अलिकडील काळात जंगल परिसरातील तथा गाव परिसरात नदीकाठी, ओठ्याकाठी उगवणारी घाणेरी तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. वास्तविक ही घाणेरी फुलपाखरांच्या अधिवासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे त्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती बुलडाणा येथील किटक अभ्यासक प्रा. अलोक शेवडे यांनी दिली. या व्यतिरिक्त रस्त्या लगतचा तरोटा, फुले तथा जंगलात आढणारी वनस्पती तथा काटेरी बोंड येणाऱ्या झुडपावर प्रामुख्याने पुलपाखरे आढळून येतात. त्यामुळे फुलपाखरंच्या संवर्धनामध्ये देशी असलेली छोटी झुडपेही महत्त्वाची भूमिका निभावतात.

जिल्ह्यात या प्रजातीची फुलपाखरे झाली दुर्मिळबुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रेट आॅरेंज टीप, अ‍ॅन्जल् कस्टर, ब्लू पॅन्सी, ग्रे पॅन्सी, लेसर ग्रास ब्लू, डार्क ग्रास ब्लू, प्रेल ग्रास ब्लू या प्रजातीची फुलपाखरे दुर्मिळ झाली आहे. प्रामुख्याने किटक नाशकांची वाढती फरवारणी तसेच मदर प्लन्ट नष्ट होत असल्याने फुलपाखरांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. जंगली भागात घाणेरीची झुडपेही नष्ट केली जात असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या फुलपाखरांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentपर्यावरण