अमडापूर (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या उंद्री बसस् थानकाजवळ एका टाटा-४0७ मालवाहू मॅटेडोरने ६५ वर्षीय वृद्ध महिलेस जबर धडक दिल्याने तिला बुलडाणा येथे सामान्य रुग्णालयात नेले असता ती मरण पावल्याची घटना घडली आहे.६ नोव्हेंबर २0१४ रोजी सकाळी ९.३0 वाजेला मृतक धृपता लक्ष्मण घोडे वय ६५ वर्षे रा. वैरागड ही आपल्या मुलीकडे भादोला येथे जाण्यासाठी उंद्री-बुलडाणा रोडवर उभी असता टाटा-४0७ मॅटेडोर क्रमांक एम.एच.१७ सी ६७२७ च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून धृपताबाई घोडे हिला जबर धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार प्रवीण श्रीकिसन घोडे वय २४ रा.वैरागड याने दिल्यावरुन आरोपी टाटा-४0७ मॅटेडोर क्रमांक एम.एच.१७ सी ६७२७ च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास पीएसआय रवींद्र जाधव हे करीत आहे.
मालवाहू वाहनाच्या धडकेने ६५ वर्षीय महिला ठार
By admin | Updated: November 6, 2014 23:22 IST