सिंदखेडराजा (बुलडाणा): सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात सांयकाळी ६ वाजता पर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले असून, ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रथम ७ ते ९ वाजतापर्यंत मजूर वर्गाने मतदानाचा हक्क बजावून आपल्या शेतीच्या कामाला निघून गेले. सकाळी १0 वाजता नंतर दुपारी ३ वाजतापर्यंत म तदान केंद्रावर शुकशुकाट होता. दुपारच्या नंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढून ६ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. शेवटच्या तीन तासात ३0 ते ३५ टक्के मतदान झाल्याने सरासरी टक्केवारी ६४.६0 टक्क्यापर्यंत पोहचली. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८२ हजार ८१७ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार ६८२ मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रावर गर्दी असल्यामुळे सायंकाळी ७ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु ठेवावी लागली. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते. सिंदेखडराजा मतदारसंघएकुण मतदान १,८२,६८२महिला ८४,६१0पुरुष ९८,0७२मतदान केद्र ३१४
६५ टक्के मतदान
By admin | Updated: October 16, 2014 00:52 IST