शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५८ ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित; पाणी पुरवठ्यावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:32 IST

मेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत गाव स्तरावर पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे २ कोटी ८४ लाख रुपये थकले

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत गाव स्तरावर पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून, जवळपास १०९ पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन आहेत. अनेक ग्रामपंचायतींचे विद्युत देयके थकीत असल्याने त्या त्या ग्रामपंचायतचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील अकोला ठाकरे, परतापूर, पिंप्रीमाळी, उकळी, घाटबोरी, सुकळी, मुंदेफळ, हिवरा खु., शेलगाव काकडे, विवेकानंद नगर, विश्वी, वरूड, लोणी गवळी, गुंज, गोहगाव, मादणी, पारंगखेड, वाडी मोसंबी, बरटाळा, लोणी गवळी, विठ्ठल वाडी, वरूडी, वडगाव माळी, मोहना बु., सावंगी माळी, पिंपळगाव, हिवरा बु., कासारखेड, सावत्रा, वडाळी, जामगाव, सारंगपूर, बेलगाव, मांडवा फॉरेस्ट, सुळा, डोणगाव, साब्रा, जैताळा, घुटी, सारंगपूर, सुभाणपूर, मोळा, सावंगीविहिर, गौंढाळा, उसरण, नागझरी, पारखेड, नांद्रा, चायगाव, भोसा, कनका या ग्रामपंचायतींचे  वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींकडे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा वेळी अनेक ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन बंद केल्याने गावकºयांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. 

सवणा येथील विद्युत पुरवठा बंद!सवणा : येथील पथदिवे २७ फेब्रुवारीपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी श्याम करवंदे तसेच ७५ गावकºयांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तालुक्यातील सवणा ग्रामपंचायतचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने रात्री रस्त्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे गावकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासंदर्भात सवणा सरपंच नंदा हाडे व सदस्यांना विचारणा केली असता विद्युत देयक जि.प.मार्फत शासन भरणा करीत असते; परंतु शासनाने जि.प.ला अनुदान न दिल्यामुळे जि.प.ने सदर बिल भरणा केले नाही, त्यामुळे विद्युत विभागामार्फत विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात येते. येत्या आठवड्यात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

अनेक ग्रामपंचायतींकडे विद्युत बिलाचे लाखो रुपये थकीत आहेत. मार्च महिन्यामध्ये थकीत विद्युत बिलाची वसुली सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतने विद्युत बिलाचा भरणा केल्यास वीज पुरवठा सुरळीत सुरू  ठेवण्यात येईल.- प्रशांत कलोरे,अभियंता महावितरण, उपविभाग, मेहकर 

टॅग्स :Mehkarमेहकरmahavitaranमहावितरण