शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ५६ हजार नागरिक दुर्धर आजारांनी ग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 11:06 IST

Buldhana News ‘माझे कुटंब, माझी जबाबदारी’ अभियानात ५६,१२० नागरिक दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात व्यापकस्तरावर राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटंब, माझी जबाबदारी’ अभियानात ५६,१२० नागरिक दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या टप्प्यात २६ लाख ६० हजार नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करण्यात आली. सोबतच त्यांना कोराना संसर्गाच्या संदर्भाने आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्यामध्ये ही माहिती समोर आली. यासोबतच सारी, आयएलआय या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या आजारांचेही रुग्ण आढळून आल्याचे सुत्रांनी सांगितले.दरम्यान, या अभियानांतर्गत जिल्ह्यात घरोघरी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १३ हजार १७८ संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६४७ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्या होत्या. तसेच अभियानात ताप असलेले व ज्यांच्या शरिरातील ऑक्सीजनचे प्रमाण निकषानुसार कमी आहे, अशा आणि दुर्धर आजार असणार्यांवर अभियानात लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यांच्यावर त्वरीत जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये उपचार करण्यास प्राधान्य दिले गेले होते.

कोरोना पािझिटिव्ह किती?अभियानाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण ६४७ कोरोना बाधीत व्यक्ती सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५१२ तर दुसऱ्या टप्प्यात १३५ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या. त्यांच्यावर नंतर उपचार झाले.

अभियानात जिल्हा तिसराअभियानातंर्गत अनुषंगीक आँपमध्ये आँनलाईन माहिती भरण्यात जिल्हा राज्यात तिसरा आला आहे. कोल्हापूर, नगर जिल्ह्यानंतर बुलडाणा जिल्ह्याचा यात क्रमांक लागतो. पहिल्या टप्प्यातही बुलडाणा जिल्ह्याने चांगले काम केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या