शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:19 IST

प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या ३४ तासापासून खडकपूर्णा अर्थात संत चोखामेळा सागरातून ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीत करण्यात येत असून अद्यापही प्रकल्पामध्ये पाण्याची मोठी आवक होत असल्याने प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे.बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरण चार वेळा भरेल ऐवढ्या पाण्याचा हा विसर्ग आतापर्यंत करण्यात आला आहे. दुष्काळी पट्टा म्हणून मराठवाड्याची २०१२ नंतर राज्यात ओळख झाली आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर मराठवाड्याने गेल्या वर्षी हक्क सांगत जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी या प्रकल्पारून इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून वाटर ग्रीड योजना कार्यान्वीत करण्याचा निर्णय तत्कालीन पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतला होता. ९२ गावांची पाणीपुरवठा योजना खडकपूर्णावरून कार्यान्वीत करण्याचे त्यावेळी ्प्रयोजन होते. त्यामुळे विदर्भ विरुद्ध मराठवाडा असा पाण्याचा संघर्ष त्यावेळी निर्माण झाला होता. राज्यस्तरावर हा मुद्दा त्या वेळी चांगलाच गाजला होता. मराठवाड्यातील कन्नड नजीक असलेल्या गौताळा अभयारण्यातून उगम पावणाºया खडकपूर्णा नदीचे बहुतांश पाणलोट क्षेत्र हे मराठवाड्यात येत असल्याने त्यावर मराठवाड्यातून हक्क सांगितल्या जात होता. दरम्यान २०१३ नंतर गेल्या वर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प भरला होता. ऐरवी मृत साठ्याची पातळीही गाठण्यात अपयशी ठरलेला हा प्रकल्प निसर्गाच्या कृपेमुळे गेल्या दोन वर्षापासून भरत आहे. यंदाही तो आता पर्यंत भरला असता. मात्र जुलै मधील ७० टक्के पाणीपातली राखण्यासाठी विसर्ग होत आहे.

मृत साठ्याची पातळीही गाठत नव्हता खडकपूर्णा प्रकल्प२०१३ मध्ये प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात त्यानंतर मृतसाठ्याची पातळीही या प्रकल्पाने गाठली नव्हती. २०१८ मध्ये सिंदखेड राजा, लोणार व देऊळगाव राजा तालुक्यातील ४६ गावांचा पाणीप्रश्नही या प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने बिकट बनला होता. त्यावेळी नियमांना बगल देत नदीपात्रात या गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. आज मात्र निसर्गाच्या कृपेमुळे प्रकल्पाच्या मृतसाठ्याच्या (६० दलघमी) बरोबरीने प्रकल्पातून नदीपात्रात गेल्या ३२ तासात पाणी सोडण्यात आले. २४ जुलै रोजी पहाटे चार दरवाजे उघडण्यात आले होते. रात्री सर्व १९ दरवाजे ६० सेमीनेउघडण्यात आले असून अद्यापही ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा