लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामात अतिवृष्टीचा फटका सहन करणाºया शेतकºयाना रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असून जमिनीतील जादा ओलही कमी झाल्यामुळे शेतकºयानी रब्बी पेºयासाठी लगबग सुरू केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पीक कर्ज देण्याचा वेग आता वाढविण्याची गरज असून आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे.रब्बी हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या ही ३६ हजार ९८३ असून त्यापैकी प्रत्यक्षात पाच हजार ४७० शेतकºयांना आतापर्यंत पीक कर्ज देण्यात आले आहे. २० नोव्हेंबर दरम्यान १२ टक्के शेतकºयांना ३८ कोटी रुपयांच्या आसपास पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. नोव्हेंबर संपता संपता त्यात ११ कोटी ६६ लाख रुपयांची जवळपास भर पडली असली तरी पीक कर्ज वाटपचा वेग वाढविणे सध्या क्रमप्राप्त आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप आणि रब्बी मिळून आतापर्यंत ५८ हजार ८९ शेतकºयांना ४६३ कोटी २३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. एक हजार ९७० कोटी ८६ लाख रुपयांच्या वार्षिक उदिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्षात २४ टक्केच हे कर्ज वाटप झालेले आहे. खरीप व रब्बीची तुलना करता रब्बी हंगामात तुलनेने पीक कर्ज वाटपाचा वेग वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.दुसरीकडे गेल्या महिन्यातच ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांच्या निधी वाटपास मान्यता देण्यात आली होती. हा निधीही जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. दरम्यान यापैकी बहुतांश रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असून रब्बी हंगामातील पेरणीसाठी त्याचा शेतकºयांना लाभ झाला आहे. आता केंद्राकडून प्रत्यक्षात कधी मदत मिळते याची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. त्यामुळेच शेतकºयांना वर्तमान स्थितीत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची निकड असल्याचे चित्र आहे. १५ डिसेंबर पर्यंत रब्बीचा हंगाम साधारणत: राहतो. त्यामुळे शेतकºयांनी आता पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकानी रब्बीमध्ये ३३ कोटी ९१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. चार हजार २३८ शेतकºयांना प्रत्यक्षात हे कर्ज मिळाले आहे. खासगी बँकांनी ११ कोटी ९७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. त्याची टक्केवारी ३२ च्या आसपास जाते. जिल्ह्यातील ग्रामिण बँकांनी तीन कोटी ७६ रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून त्याची टक्केवारी ही १२.०७ टक्के आहे.खरीपापेक्षा रब्बी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अधिक४खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी पाहता रब्बी हंगामात खरीपाच्या तुलनेत जादा पीक कर्जवाटप करण्यात आल्याचे टक्केवारी सांगते खरीपाच्या तुलनेत रब्बीचे उदिष्ट कमी असले तरी त्याचा वाटपाचा वेग तुलनेने अधीक असल्याने ही टक्केवारी जादा आहे. खरीपात एकूण उदिष्ठाच्या २३ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले तर रब्बीमध्ये आतापर्यंत एकुण उदिष्ठाच्या २५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या काळात यातमध्ये आणखी वाढ होणार असून फेब्रुवारी पर्यंत पीक कर्ज वाटप केल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
१५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बीचे ५० कोटी कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:14 IST
आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे.
१५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बीचे ५० कोटी कर्ज वाटप
ठळक मुद्दे बँकानी रब्बीमध्ये ३३ कोटी ९१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. चार हजार २३८ शेतकºयांना प्रत्यक्षात हे कर्ज मिळाले आहे. पीक कर्ज वाटपचा वेग वाढविणे सध्या क्रमप्राप्त आहे.