फहीम देशमुख / शेगावदाखल असलेल्या प्रकरणांवर उपविभागीय अधिकारी वाघमोडे हे स्वाक्षरी करीत नसल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच एका दिवसात ५0 च्या वर प्रकरणांवर स्वाक्षर्या झाल्या आहेत. मुस्लीम समाजाला एसबीसी या प्रवर्गाचे आरक्षण बहाल झाल्याने राज्यभरातील मुस्लीम समाजाने जातीचे प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात केली. अकोला, नांदेड, जळगाव खान्देश या जिल्ह्यांमध्ये हजारो प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत; मात्र खामगाव उपविभागात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एसबीसी प्रवर्गाला त्रास होईल या उद्देशाने जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करीत असल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. तसेच जा तीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी नवीन नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही त्यावर स्वाक्षर्या केल्या जात नव्हत्या. स्वाक्षर्यांसाठी आलेल्या फाईल वर त्रुट्या काढून परत पाठविल्या जात होती. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दबावाखाली प्रमाणपत्रासाठी अडवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी प्रलंबीत असलेल्या अर्जदारांना स्वत: फोन करुन सकाळी १0 वाजता बोलावून घेतले व अवघ्या ५ मिनिटात ७ जातीच्या प्रमाणपत्र निकाली काढले आहेत.
एकाच दिवसात ५0 प्रकरणे निकाली
By admin | Updated: September 27, 2014 00:20 IST