शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ४९ हजार ८३९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:54 IST

Farmer News अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१ लाख ४४ हजार ३६५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते.जिल्ह्यासाठी ४७ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये प्राप्त झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा :  खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आला असून, अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.बुलडाणा जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३२ हजार ८४७.८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते, तर सप्टेंबरमध्ये ६१ हजार ६८९.२४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. त्या अ०नुषंगाने नुकसानाची पाहणी करून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम समानपणे टाकण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. रब्बी हंगामात हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.  जिल्ह्यातील जवळपास ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला मदत कधी मिळेल, याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पैसेवारी कमी आल्याने   नुकसान झाल्याचे स्पष्टच आहे.

दिवाळीत मिळाली होती शेतकऱ्यांना मदत दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अद्याप जिल्ह्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे लक्ष लागून राहलेले आहे.

प्राप्त ५० टक्के निधीचे झाले वाटपपहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठीप्राप्त ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. एकूण मागणीच्या तो ५० टक्के होता. आता उर्वरित ५० टक्के निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यासंदर्भाने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी