शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

४७३ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस!

By admin | Updated: March 4, 2017 02:14 IST

मोठे थकबाकीदार खामगाव पालिकेच्या रडारवर; २८८ बड्या थकबाकीदारांची यादी तयार.

खामगाव, दि. ३- : शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईची मोहीम उघडल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने आता मालमत्ता कर न भरणार्‍या ४७३ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस बजावल्या आहेत. पालिकेने २८८ बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, कारवाईचे पुढचे पाऊल म्हणून मोठय़ा आणि कर वसुलीत सहकार्य न करणार्‍यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत पालिका प्रशासन आणि थकबाकीदारांमध्ये ह्यसंघर्षह्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुलीचा आदेश नगर विकास विभागाने काढला आहे. या पार्श्‍वभूमीवर खामगाव नगरपालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली असून, या कारवाईचा एक भाग म्हणून थकबाकीदारांच्या याद्या चौका-चौकात प्रसिद्धीसाठी तयार केल्या आहेत. दरम्यान, या मोठय़ा थकबाकीदारांना सूचनावजा नोटिस बजावण्यात आल्या. या नोटिसवजा सूचनेकडे कानाडोळा करणार्‍या ४७३ थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीसाठी सक्तीच्या नोटिस बजावण्यात आल्या आहेत.खामगाव शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर विविध स्वरूपांच्या करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाकडून वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये मोठय़ा थकबाकीदारांची प्रसिद्धीसाठी, तर १२५४ जणांना मालमत्ता जप्तीच्या कारवाईची सूचनावजा नोटिस देण्यात आली. यापैकी ४७३ थकबाकीदार वगळता इतरांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेत कराचा भरणा केला आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे कानाडोळा करणार्‍यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये मालमत्ता जप्ती सोबतच नळ कनेक्शनही कापण्यात येणार आहे. सोबतच इतरही दंडात्मक कारवाई आणि नामुष्कीसाठी तयार रहावे लागणार असल्याचे सुतोवाच पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.शासकीय कार्यालयेही कारवाईच्या घेर्‍यात!शहरातील २३ शासकीय कार्यालयांकडेही पालिकेची लक्षावधींची थकबाकी आहे. मालमत्ता करासाठी या कार्यालयांकडे तगादा लावल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सुमारे ५0 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता सक्तीच्या कारवाईच्या घेर्‍यात शहरातील मोठी प्रशासकीय कार्यालयेही येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.वसुली पथकेही होणार कार्यान्वित! मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मागणीपत्रांचे वितरण करण्यात आले. शहरातील सर्वच २९ हजार ७00 मालमत्ताधारकांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर सूचनावजा नोटिस बजावण्यात आल्या. मात्र, पालिका प्रशासनाच्या या मोहिमांकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे पालिकेने मोठय़ा थकबाकीदारांची यादी तयार केली. आता मोठय़ा थकबाकीदारांसोबतच गेल्या अनेक वर्षांंपासून पालिकेच्या कराचा भरणा न करणार्‍यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस बजावण्यात आल्या आहेत. तसेच कारवाईचा पुढील टप्पा म्हणून कर वसुलीसाठी विशेष पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.शंभर टक्के कर वसुलीसाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने संपूर्ण उपाययोजना केली आहे. यासाठी वसुली पथकही तयार केले असून, मोठय़ा थकबाकीदारांच्या नावाची यादीही तयार केली आहे. नागरिकांनी कर वसुलीत सहकार्य करावे.- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी, खामगाव.