दरम्यान, जलजीवन मिशनअंतर्गत नवीन ५७ योजना जिल्हा परिषदेंतर्गत, तर जीवन प्राधिकरणांतर्गत पाच योजनांची कामे हाती घेण्यात येणार आहे. या ६२ योजनांचा डीपीआरही यंत्रणांनी पूर्ण केला आहे. पैकी २७ योजनांचे डीपीआर तयार करण्यात आले असून, त्यातील नऊ योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या योजनांची कामे अल्पावधीतच सुरू होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. दुसरीकडे निर्माणाधीन योजनांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, त्यासाठी ११ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी १० कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च योजनांच्या कामावर झाला आहे.
४७ कोटी रुपयांची कामे सुरू
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ४७ कोटी रुपयांच्या योजना प्रगतिपथावर असून, या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या योजनांवर जवळपास ४६ काेटी रुपयांचा खर्च झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मार्चअखेर बुलडाण्याला खडकपूर्णाचे पाणी
सुमारे ५७ किलोमीटर अंतरावरून बुलडाणा शहरासाठी ११३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या योजनेचे मार्चअखेर बुलडाणा शहरास पाणी उपलब्ध होणार आहे. येळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत त्याची जलवाहिनी तोवर पूर्ण होईल. खडकपूर्णा प्रकल्पातील ९.५९ द.ल.घ.मी. पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास बुलडाण्यास दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा होईल.
दोन योजना कार्यान्वित
दीर्घ कालावधीपासून रखडलेल्या देऊळघाट, धाड, तिवाण नऊ गावे, रोहीणखेड आणि हिंगणे गव्हाड १३ गावे, या योजनांपैकी रोहीणखेड व हिंगणे गव्हाड १३ गावे, या योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन योजनांची कामे प्राधान्याने करण्याची सूूचना आहे.