शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

बुलडाणा जिल्ह्यातील ३८१ पाणीपुरवठा योजनांसाठी हवेत ४५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:24 IST

Water supply schemes in Buldana district जवळपास ४५० कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सुमारे २६ लाख नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ३८१ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यापैकी त्यासाठी जवळपास ४५० कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील या उपक्रमाची नेमकी  स्थिती काय? तथा योजना प्रत्यक्षात नेमक्या कधीपर्यंत पूर्ण होतील, यासंदर्भाने माहिती घेतली असता ही बाब समोर आली. या ३८१ याेजनांपैकी ६२ योजनांना गेल्या आर्थिक वर्षातच मान्यता देण्यात येऊन त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, २४८ नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.  राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत १११ योजना जिल्हा परिषद व चार योजना जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या पूर्ण करण्यात येत आहे. त्यांचीही कामे अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील जवळपास १६ योजनांची कामे पूर्ण झाली.दरम्यान, जलजीवन मिशनअंतर्गत नवीन ५७ योजना जिल्हा परिषदेंतर्गत, तर जीवन प्राधिकरणांतर्गत पाच योजनांची कामे हाती घेण्यात येणार आहे. या ६२ योजनांचा डीपीआरही यंत्रणांनी पूर्ण केला आहे. पैकी २७ योजनांचे डीपीआर तयार करण्यात आले असून, त्यातील नऊ योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या योजनांची कामे अल्पावधीतच सुरू होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. दुसरीकडे निर्माणाधीन योजनांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, त्यासाठी ११ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी १० कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च  झाला आहे.

४७ कोटी रुपयांची कामे सुरूराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ४७ कोटी रुपयांच्या योजना प्रगतिपथावर असून, या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या योजनांवर जवळपास ४६ काेटी रुपयांचा खर्च झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मार्चअखेर बुलडाण्याला खडकपूर्णाचे पाणीसुमारे ५७ किलोमीटर अंतरावरून बुलडाणा शहरासाठी ११३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या योजनेचे मार्चअखेर बुलडाणा शहरास पाणी उपलब्ध होणार आहे. येळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत त्याची जलवाहिनी तोवर पूर्ण होईल. खडकपूर्णा प्रकल्पातील  ९.५९ द.ल.घ.मी. पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास बुलडाण्यास दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा होईल.

दोन योजना कार्यान्वितदीर्घ कालावधीपासून रखडलेल्या देऊळघाट, धाड, तिवाण नऊ गावे, रोहीणखेड आणि हिंगणे गव्हाड १३ गावे, या योजनांपैकी रोहीणखेड व हिंगणे गव्हाड १३ गावे, या योजना कार्यान्वित झाल्या  आहेत. त्यामुळे उर्वरित तीन योजनांची कामे प्राधान्याने करण्याची सूूचना आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater transportजलवाहतूक