शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातून ४५ परप्रांतीय मजूरांना दोन बसेसद्वारे सोडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:56 IST

संचारबंदीत अडलेल्या ४५ मजुरांना सोमवारी दुपारी खामगाव येथून दोन विशेष बसेसद्वारे सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संचारबंदीत अडलेल्या ४५ मजुरांना सोमवारी दुपारी खामगाव येथून दोन विशेष बसेसद्वारे सोडण्यात आले.  नाशिक येथे स्थलांतरीत मजूर असलेले  ओरीसा आणि उत्तरप्रदेशातील ४५  मजूर रविवारी रात्री खामगावातून पायी जात होते. शहर पोलिस स्टेशनसमोर सुरू असलेल्या तपासणी दरम्यान, या मजुरांना खामगावात थांबविण्यात आले. त्यानंतर या मजुरांना सोमवारी दुपारी त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.कोरोना संचारबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद पडलेत. बांधकामेही बंद पडल्याने गत महिना-दीड महिनाभरापासून या मजुरांचे हाल होत आहेत. नजीकच्या काळात रोजगार उपलब्ध होण्याची आशा धुसर झाल्याने गत आठ दिवसांपूर्वी ४५ मजूर आपल्या चिल्यांपिल्यांसह नाशिक येथून पायी निघाले. रविवारी खामगावात रात्री अवकाळी पाऊस सुरू असताना शहर पोलिस स्टेशन समोर या मजुरांना पोलिसांनी थांबविले. त्यांची चौकशी केल्यानंतर ते पायी ओरीसाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले असता, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी आपल्या पथकाच्या मदतीने या मजुरांची बसस्थानकात राहण्याची व्यवस्था केली. शहरातील एका सामाजिक संस्थेच्यावतीने या मजुरांची रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर महसूल प्रशासनाच्या सहकार्याने या मजुरांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या मजुरांना सोडण्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर, स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. महाराष्ट्रातील औसापर्यंत या मजुरांना सोडण्यात येणार असल्याचे समजते.

 

लहानग्याच्या सायकलीचाही ‘एसटी’तून प्रवास!नाशिक येथून ३७२ कि.मी. पायी प्रवास करीत खामगावात आलेल्या एका मजुराने आपल्या मुलांना त्यांच्या सायकलीने आणले होते. दरम्यान, मजुरांना बसमधून सोडताना सायकल बसमध्ये ठेवण्यास चालक-वाहकाने नकार दिला. त्यावेळी या मजुराने सायकल विक्री करण्याचे ठरविले. बसस्थानकातील काहींनी सायकल विक्रीचा सौदाही केला. त्यावेळी या मजुराच्या मुलाच्या डोळ्यात अश्रृ तरळले. ही बाब निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या निर्दशनास येताच, त्यांनी त्या मजुराला सायकल बसमधून नेण्यास अनुमती दिली.

 नाशिक येथून पायी आलेल्या ४५ मजुरांना पावसामुळे रात्री खामगाव येथे मुक्कामी ठेवले. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. महसूल प्रशासनाच्या मदतीने या मजुरांना दोन बसेसच्या माध्यमातून दुपारी खामगावातून सोडण्यात आले.-सुनिल अंबुलकरनिरिक्षक, खामगाव शहर.

 

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगार