शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

जिल्ह्यातील ४.५ लाख अल्पभुधारक शेतकऱ्यांचे पिकर्ज माफ होणार!

By admin | Updated: June 12, 2017 20:11 IST

जुनी रक्कम जमा झाल्याशिवास नवे पिककर्ज नाही

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५२ हजार ८७८ अल्पभुधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे पिकर्ज माफ होणार आहे. मात्र, अद्याप शासनाचे कोणतेही दिशानिर्देश आले नसल्यामुळे बँकेचे अधिकारी कर्जमाफी कशी द्यायची, याबाबत संभ्रमात आहेत.गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली तर त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्राही काढली. संपूर्ण राज्यात विविध पक्षांच्यावतीने कर्जमाफीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शेतकरी संपावर गेले. या सर्वांची फलश्रृती कर्जमाफीत झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्याची घोषणा केली. जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ६३ हजार १३८ असून, यापैकी ४ लाख ५२ हजार ८७८ शेतकरी अल्पभुधारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १५ हजार १०५ शेतकऱ्यांकडे १२९० कोटी रूपयांचे कर्ज आहे. यापैकी अत्यल्प भुधारक १ लाख १३ हजार ८४४  शेतकऱ्यांकडे ४३० कोटी, अल्प भुधारक ८२ हजार ४०३ शेतकऱ्यांकडे ६१० कोटी रूपये तर अन्य २ लाख ८५८  शेतकऱ्यांकडे २४९ कोटींचे पिककर्ज आहे. शासनाने सध्या केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील  १ लाख ९६ हजार २४७ अल्पभुधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे कर्ज माफ होणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याच्या विचारात असून, सरसकट पिक कर्जमाफी झाली तर २ लाख १७ हजार १०५ शेतकऱ्यांचे १२९० कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती असून, गत चार पाच वर्षांपासून चांगले उत्पन्न झाले नाही. ज्यावेळी उत्पन्न झाले तर भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.