शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

बुलडाणा जिल्ह्यातील ४३६ महिलांना मिळणार सरपंचपद भूषविण्याचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:41 IST

Buldhana News ४३६ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच राहतील हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींची निवडणूक रखडलेली होती.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही आरक्षण सोडत झाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ८७० पैकी ४३६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच म्हणून महिलांना बहुमान मिळणार असल्याचे १० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या महिला सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींपैकी मोठ्या ग्रामपंचायतींमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत १० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही आरक्षण सोडत झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसीलदार रूपेश खंडारे यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय महिलांचे आरक्षण तहसीलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले. सकाळी ११ वाजता या बैठकीस प्रारंभ झाला. आगामी २०२० ते २०२५ या कालावधीसाठी हे सरपंचपदाचे आरक्षण राहणार आहे.५० टक्के आरक्षणाच्या नियमानुसार ४३६ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच राहतील हे स्पष्ट झाले आहे. यात खुल्या प्रवर्गातील २०८, अेाबीसी ११८, अनुसूचित जमाती २५, तर अनुसूचित जातींसाठी ८५ पदे महिलांसाठी आरक्षित राहतील. दरम्यान, गेल्या सहा ते सात महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींची निवडणूक रखडलेली होती. या आरक्षणामुळे आता या निवडणुकींचाही मार्ग मोकळा झाला असून, जानेवारीअखेर या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी आता राजकारण ढवळून निघत आहे.

बुलडाण्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्येही महिला सरपंचबुलडाणा तालुक्यातील ६६ पैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचपद भूषविणार आहेत. राजकीय व सामाजिकदृ्ष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलडाणा तालुक्यातील काही गावांचा यात समावेश आहे. प्रामुख्याने कोलवड येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिला, अजीसपूर, धाड, देऊळघाट, साखळी खुर्द, धामणगाव आणि वाकद सरपंचपद अनुसूचित  जातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नांद्रा कोळी, चांडोळ, माळवंडी, रुईखेड मायंबा, घाटनांद्रा, सिंदखेड, देवपूर, रुईखेड टेकाळे, केसापूर, पळसखेड नागो, वरवड, भडगाव, सोयगाव, पिंपळगाव सराई, चौथा आणि मौंढाळा येथील सरपंचपद आरक्षित राहील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच