शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील गँगस्टरच्या नावाने मागितली ४० लाखांची खंडणी; भिती दाखवण्यासाठी कारची फोडली काच

By निलेश जोशी | Updated: July 9, 2023 18:56 IST

पंकज अरुण खर्चे (४२) यांनी या प्रकरणी रविवारी सकाळी ही तक्रार दिली आहे. 

बुलढाणा : पंजाब, हरयाणासह राजस्थानमध्ये दहशत असलेल्या कुख्यात गँगस्टर नीरज बवानाच्या नावावर बुलढाण्यातील एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला कथितस्तरावर धमकावण्यात आले आहे. सोबतच घरासमोरील कारचा काच फोडून ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण ९ जुलै रोजी समोर आले आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  शहरातील केशव नगरमध्ये राहणारे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर पंकज अरुण खर्चे (४२) यांनी या प्रकरणी रविवारी सकाळी ही तक्रार दिली आहे. 

त्यानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना एक कॉल आला होता. त्यात ४० लाख रुपयांची मागणी करण्यात येऊन तुझी सर्व जन्मकुंडली मला माहित असल्याचे अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे. पैसे दिले नाही तर गेम करून टाकील अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान पंकज खर्चे सकाळी सव्वा सहाच्या सुमाराच्या घराच्या बाहेर आले असता त्यांच्या कारची मागील काच फुटलेली दिसली. कार जवळच एक चिठ्ठी आढळली. त्यात हिंदी भाषेत मजकूर लिहिलेला होता. “तुला फोन केला होता. मी नीरज बवानाचा उजवा हात आहे. तीन दिवसाचा वेळ देतो. ४० लाख रुपये दे. पैसे दिले नाही तर तुझ्या घरी पत्नी आणि तुझ्या दोन मुली राहतात, अशा आशयाची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारासंदर्भात पंकज खर्चे यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केली पाहणीतक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी पंकज खर्चे यांच्या निवास्थानाची पहाणी केली. सोबतच सापडलेली चिठ्टीही ताब्यात घेतली आहे. घटनेच्या अनुषंगाने पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. यासंदर्भात बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात विचारणा केली असता तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत, प्रकरणातील तथ्य लवकच समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी