शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३६१ वाईन शॉप, बीअर बार बंद

By admin | Updated: April 2, 2017 01:39 IST

राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गापासून ५00 मीटरच्या आत असलेले ३६१ वाईन शॉप, बीअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत.

बुलडाणा, दि. १- जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गापासून ५00 मीटरच्या आत असलेले ३६१ वाईन शॉप, बीअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून ५00 मीटरच्या आत असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे शनिवारी बुलडाणा शहरातील खामगाव- बुलडाणा रोड, मलकापूर- चिखली रोड, मलकापूर- सोलापूर, धाड रोडवरील सर्व वाईन शॉप व बीअर बार सकाळी उघडण्यात आले नाहीत. जिल्ह्यात सीएल - ३ अनुज्ञप्ती ८२ असून, एफएल - २ अनुज्ञप्ती १६, एफएल - ३ अनुज्ञप्ती २२२, एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती ४१ असे एकूण ३६१ आहेत. शनिवारी सकाळपासूनच सर्व दुकाने बंद होती. महामार्गालगत असलेल्या बारमालकांनी १ एप्रिलपासून बार बंद केले असले, तरी नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. शहरातील मध्यभागी काहींनी आधीच प्लॉट घेऊन ठेवले आहेत.  त्या ठिकाणी आता लवकरच बार किंवा वाईन शॉपचे बांधकाम सुरू होणार आहे. तसेच काही बारमालक यातून कोणता मार्ग काढता येईल, यावर विचार करीत आहेत. महामार्गावरील बार बंद असल्यामुळे शहरातील बारवर गर्दी झाली होती.