बुलडाणा: सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यात वाटप करावयाच्या जमिनीचे ३३५ एकराचे प्रस्ताव विविध करणांनी रखडले असून, या आर्थिक वर्षात तरी या जमिनीचे वाटप होणार की नाही, अशी शंका निर्माण होत आहे. अनुसूचित जातीच्या नवबौद्ध घटकातील भूमिहीनांचा आर्थिक स्थर उंचविण्यासाठी त्यांना ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती शेती वितरित करण्याची सामाजिक न्याय विभागाची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे. सन २00४ पासून शासनाने ही योजना सुरू केली आहे. ५0 टक्के अनुदान आणि ५0 टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात लाभार्थ्यांंना ही जमीन वाटप केली जाते. जमीन हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षानंतर लाभार्थ्यांंकडून १0 वर्षात हे कर्ज भरावयाचे आहे. ३ लाख रुपये एकर या शासकीय भावाने समाजकल्याण विभाग जमीन खरेदी करून ती लाभार्थ्यांंना वाटप करते. बुलडाणा जिल्ह्यात या योजनेंतर्गत सन २0१५ - १६ या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय विभागाकडे जवळपास ३३५ एकर जमिनीचे परिपूर्ण प्रस्ताव तयार असून, या जमिनीचे वाटप विविध कारणांनी रखडले आहे. सर्वाधिक प्रस्ताव हे खामागाव तालुक्यातील २७८ एकरांचे असून, ७८ लाभार्थी आहेत. त्या पाठोपाठ चिखली तालुक्यात ३५ एकरांचे तर मेहकर आणि लोणार तालुक्यात १५ एकर वाटपाचे आणि सिंदखेडराजा तालुक्यातील ५ एकरांचे प्रस्ताव आहेत; मात्र वाटप करावयाच्या ह्या जमिनीसाठी गठित करण्यात आलेल्या तालुका समित्यांनी अद्याप बैठक बोलावून या प्रस्तावाला मंजुरात न दिल्यामुळे जमिनीचे हे वाटप रखडले आहे.
३३५ एकर जमीन वाटपाचे प्रस्ताव रखडले!
By admin | Updated: December 11, 2015 02:36 IST